कोशीयारी समितीच्या शिफारशी लागु करा. - खासदार प्रतिभा धानोरकर


ईपीएस-95 योजने अंतर्गत पेंशन मध्ये वाढ करण्याची लोकसभेत मागणी.



केंद्र सरकारच्या श्रम मंत्रालयाद्वारे ईपीएस-95 योजना राबविली जाते. या योजने अंतर्गत सेवेतून निवृत्त झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना पेंशन देण्यात येते. परंतु, देण्यात येणारी पेंशन हि अत्यल्प असल्याने या संदर्भात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभेत केंद्र सरकार कडे प्रश्न उपस्थित करुन ईपीएस-95 योजनेतील पेंशन धारकांच्या पेंशनमध्ये वाढ करण्याची मागणी केली.


सध्या ईपीएस-95 योजने अंतर्गत पेंशन धारकांना 1000 ते 4000 रुपयांपर्यंत पेंशन मिळत आहे. त्यासोबत कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ सदर कर्मचाऱ्यांना घेता येत नाही. त्यामुळे, सदर कर्मचाऱ्यांचे जगणे कठीण होत चाचले आहे. या कर्मचाऱ्यांनी अंशदानाची जमा केलेली रक्कम व दिलेले सेवेचे वर्ष लक्षात घेता कर्मचाऱ्यांचे केंद्र सरकार कडे लाखो रुपये जमा असल्याची बाब खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्र सरकार च्या निदर्शनास आणून दिले. ईएपीएफओ कडे कर्मचाऱ्यांनी सन 1995 पासुन रु. 415, 2001 पासुन रु. 541 तर 2014 पासुन रु. 1250 जमा केले आहे. याच रकमेतून सध्याची महागाई व सरकार कडे कर्मचाऱ्यांची जमा असलेले रक्कम बघता कोशीयारी समितीने रु. 9000 तसेच महागाई भत्ता व निवृत्त कर्मचाऱ्यांच्या कुटूंबाला आरोग्य सुविधा देण्याची शिफारस केली होती. या शिफारसी केंद्र सरकारने मान्य करण्यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभेत मागणी केली. सदर मागणी पुर्ण झाल्यास ईपीएस-95 योजने अंतर्गत निवृत्त कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे.
Previous Post Next Post