नागरिकांच्या घरांना कायमस्वरूपी पट्टे द्या. - खासदार प्रतिभा धानोरकर शासनाने नागरीकांची बाजू न्यायालयात मांडण्यासाठी खासदारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र



महाराष्ट्रात न्यायालयाच्या आदेशावरुन अनेक घरांना शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याचे कारण दाखवून अतिक्रमीत जागा 7  दिवसांच्या आत घरासह खाली करण्याचे पत्र अनेक नागरीकांना प्राप्त झाल्याने त्यांच्यावर बेघर होण्याची वेळ आली आहे. या संदर्भात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्यमंत्री व महसुल मंत्री यांना पत्र लिहून वरील विषयात नागरीकांची बाजू न्यायालयात मांडून कायमस्वरुपी पट्टे देण्याची मागणी केली आहे.


जिल्ह्यातील सर्व तालुक्यात शासकीय जागेवर अतिक्रमीत केलेल्या रहीवासी असलेल्या नागरीकांना प्रशासनाचे न्यायालयाच्या आदेशान्वये जागा रिक्त करण्याचे पत्र आल्याने अनेक नागरीकांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. या संदर्भात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महसूल मंत्र चंद्रशेखर बावणकुळे यांना पत्र लिहून न्यायालयात शासनाने नागरीकांची बाजू मांडावी. तसेच, त्यांना बेघर होण्यापासून थांबवावे अशी विनंती खासदार धानोरकर यांनी पत्राद्वारे केली आहे. 


30 ते 40 वर्षांहून अधिक कालावधी लोटून गेल्याने नागरीकांनी अतिक्रमीत करून घरे बांधलेल्या जागांना कायमस्वरुपी पट्टे देऊन नियमानुकूल करण्याची मागणी खासदार धानोरकर यांनी केली आहे. या संदर्भात खासदार धानोरकर यांचेकडे नागरिकांचे निवेदन प्राप्त होताच त्यांनी या विषयाच्या अनुषंगाने शासनाकडे पाठपुरावा केला आहे. तसेच, शासकीय जागेवर भविष्यात शासनाची कुठलीही विकासात्मक योजना नसल्यास अशा जागांवरील अतिक्रमण धारकांना शासनाने पट्टे द्यावेत अशी देखील मागणी खासदार धानोरकर यांनी केली आहे. 


Previous Post Next Post