ओबीसींच्या न्याय मागण्यांना सरकार ने गांर्भीयाने घ्यावं- खासदार प्रतिभा धानोरकर
देशात ओबीसी प्रर्वगातील नागरीकांची संख्या लक्षणीय असनू केंद्र सरकार ने ओबीसींच्या न्याय मागण्यांकडे गांर्भीयाने लक्ष देण्याचे मत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्रीय ओबीसी समितीच्या दिल्ली येथे आयोजित बैठकी दरम्यान व्यक्त केले.
केंद्रीय ओबीसी समितीची बैठक दिल्ली येथे दि. 28 फेब्रूवारी रोजी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत प्रामुख्याने अलिगढ मुस्लीम विद्यापीठ तसेच जामीया मिलीया इस्लामिया या विद्यापीठातील ओबीसी विद्यार्थ्यांच्या त्या सोबतच ओबीसी कर्मचाऱ्यांच्या संदर्भातने चर्चा करण्यात आली. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी ओबीसी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्ती वर चर्चा केली. विद्यापीठातील राखीव ओबीसींच्या आरक्षणावर देखील यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी चर्चा केली. ओबीसींची संख्या देशात लक्षणीय असल्याने ओबीसींना मिळणाऱ्या सोयी सुविधांकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे देखील मत यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले.
या बैठकीवेळी ओबीसी कमेटीची चेअरमन गणेश सिंह, सचिव संजीव शर्मा यांसह ओबीसी कमेटीच्या सदस्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती