खासदार धानोरकर यांनी 27 जानेवारी पासून सुरु झालेल्या गोंडपिपरी तालुक्यातील धाबा येथे कोंडय्या महाराजांच्या देवस्थानात यात्रे निमित्त भेट दिली. यावेळी त्यांनी मंदिरात सुरु असलेल्या किर्तनात देखील त्या रमनाम झाल्या.
संत कोंडय्या महाराज देवस्थान तर्फे दरवर्षी होऊ घातलेल्या यात्रेनिमित्त खासदार धानोरकर यांनी भेट दिली. यावेळी खासदार धानोरकर यांचा कोंडय्या महाराज देवस्थान समिती तर्फे सत्कार देखील करण्यात आला. यावेळी देवस्थानात काळे महाराजांचा किर्तनाचा कार्यक्रम सुरू होता.
खासदार धानोरकर यांना देखील किर्तनाचा मोह आवरता आला नाही. त्यांनी काही वेळ किर्तन ऐकुण घेतले आणि त्यानंतर उपस्थित भक्तांना संबोधित करतांना म्हणाल्या कि, फक्त किर्तन मनोरंजनासाठी म्हणून कोणीही ऐकू नये तर किर्तनाचा सार हा खऱ्या आयुष्यात प्रत्येकाला उतरवता आला पाहिजे. प्रत्येकांनी ग्रामगीता आणि संविधान या अनुसार आचरण केल्यास जिवन देखील सुखकर होईल असे देखील मत खासदार धानोरकर यांनी व्यक्त केले. कोंडय्या महाराज देवस्थानाच्या प्रगती करीता मी सदैव कटिबध्द असल्याचे मत खासदार धानोरकर यांनी व्यक्त केले आणि यात्रे निमित्त समस्त भक्तांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी देवस्थान समितीचे सदस्य तसेच कॉग्रेस चे तालुका अध्यक्ष देविदास सातपुते यांच्यासह अनेक पदाधिकारी, सदस्य तथा नागरीकांची उपस्थिती होती.
Tags
warora