आश्वासनाची खैरात आणि निराशादायक अर्थसंकल्प- खासदार प्रतिभा धानोरकर
केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सितारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात केवळ घोषणांचा समावेश आहे. जनसामान्यांसाठी तसेच तरुण, महिला, शेतकरी व शेतमजूर यांच्यासाठी या अर्थसंकल्पातून काहीच साध्य झाले नसल्याची खंत खासदार धानोरकर यांनी या अर्थसंकल्पावर प्रतिक्रीया देताना व्यक्त केली. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील मोदी सरकार जनसामान्यांची दिशाभूल करीत असल्याचे या अर्थसंकल्पातून दिसून येत आहे. तरी देखील मी मागणी केेलेल्या 10 लाख रुपयापर्यंतचे उत्पन्न कर मुक्त करण्यासंदर्भात 12 लाख रुपयापर्यंत उत्पन्न कर मुक्त केल्याने हि एक बाब सामान्यांसाठी दिलासा देणारी आहे.
Tags
Chandrapur