वरोरा अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना व जखमींना आर्थीक मदत द्या - खासदार प्रतिभा धानोरकर खासदार धानोरकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र.

  • वरोरा अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना व जखमींना आर्थीक मदत द्या - खासदार प्रतिभा धानोरकर
  • खासदार धानोरकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र.



चंद्रपूर : दि. 26 जानेवारी रोजी वरोरा-रामपूर जवळील नागपूर महामार्गावर कार ने ऑटोला दिलेल्या धडकेत भिषण अपघात होऊन दोन महिलांचा जागीच मृत्यु तर दहा महिला गंभीर जखमी झाल्या आहे. सदर महिलांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत करण्यासंदर्भांने खासदार धानोरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे मागणी केली आहे.

खासदार प्रतिभा धानोरकर यांनी रस्ता सुरक्षा समितीच्या झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना अपघात कमी करण्यासाठी सुचना केल्या होत्या. परंतु वाहन चालकाच्या निष्काळजीपणाने अनेकदा अपघाताचे प्रसंग उद्भवत असतात. दि. 26 जानेवारी रोजी वरोरा-रामपूर गावाजवळ नागपूर महामार्गावर एक कार ने दिलेल्या धडकेत ऑटोतील 3 महिलांचा जागीत मृत्यु झाला तर इतर दहा महिला या गंभीर जखमी झाल्या आहेत. यासंदर्भात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी अपघाताची माहिती मिळताच अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर यांच्या संपर्क साधुन सर्व जखमींची विचारपूस केली. तसेच, मृत कुटूंबीयांच्या घरी सांत्वनपर भेट देत अपघातातील सर्व जखमींच्या व मृतांच्या सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले होते. सर्व महिला उसतोड मजुर कामगार असल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने त्यांच्या मदतीसंदर्भात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित मृतांच्या कुटूंबीयाना व जखमींना मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत करण्याची विनंती केली आहे. वरील प्रकरणा संदर्भात खासदार धानोरकर ह्या मुख्यमंत्र्यांची भेट देखील घेणार आहेत.
Previous Post Next Post