चंद्रपूर : पो.स्टे चंद्रपूर शहर गुन्हे शोध पथकास आवेश कुरेशी व आशिक शेख हे दोघे संगणमत करून एम.डी. अंमली पदार्थ विकत आहे. अशी माहीती मिळालेली होती. त्यावरून दिनांक २४/०१/२०२५ रोजी आशिक शेख हा हनुमान खिडकीजवळ एम.डी. विकत असल्याची माहीती मिळाली त्यावरून पोस्टे चंद्रपूर शहर गुन्हे शोध पथकाने आशिक गफुर शेख यावर छापा मारून जप्ती कार्यवाही करून त्याच्या कडुन २०,०००/- रूपयाची एम.डी. हा अमली पदार्थ जप्त केला. तसेच त्याचा मोबाईल व मोटार सायकल असा एकुन ६०,०००/- रूपयाचा माल जप्त करण्यात आला आहे. संगणमत करून एम.डी. अंमली पदार्थ विकणारे आशिक शेख व आवेश कुरेशी यांच्यावर एन.डी.पी.एस अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आशिक शेख रा. दादमहल वार्ड यास अटक करण्यात आली असुन दुसरा आरोपी आवेश कुरेशी पसार झाला आहे. आवेशी कुरशी यावर यापुर्वी देखील अंमली पदार्थ विकीसंबधाचे गुन्हे दाखल आहेत. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
सदर कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री मुमक्का सुदर्शन सा. चंद्रपूर, मा. अपर पोलीस अधिक्षक रिणा जनबंधु मॅडम, मा. उपविभागिय पोलीस अधिकारी श्री सुधाकर यादव, यांचे मार्गदर्शनाखाली पोनि प्रभावती एकुरके मॅडम चंद्रपूर शहर, पोस्टे गुन्हे शोध पथकाचे पोउपनि संदिप बच्छिरे, पोहवा सचिन बोरकर, संतोष कनकम, भावना रामटेके, नापोअ कपुरचंद्र खरवार, पोअ इम्रान खान, दिलीप कुसराम, इर्शाद खान, रूपेश रनदिवे, राजेश चिताडे, विक्रम मेश्राम यांनी केली असुन गुन्हयाचा पुढील तपास सपोनि राजेंद्र सोनवने हे करित आहेत.
Tags
Crime