भविष्यात प्रशासकीय सेवेला समाजसेवेची जोड द्या. - खासदार प्रतिभा धानोरकर राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे थाटात उद्घाटन.

भविष्यात प्रशासकीय सेवेला समाजसेवेची जोड द्या. - खासदार प्रतिभा धानोरकर

राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे थाटात उद्घाटन.


विद्यार्थ्यांनी भविष्यात प्रशासकीय अधिकारी नक्की व्हावे परंतु त्यासोबतच समाजसेवेला देखील आपला हातभार लागेल यासाठी देखील प्रयत्न करावे असे मत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.




छात्रवीर राजे संभाजी प्रशासकीय सेवा महाविद्यालय तर्फे जिल्हा परिषद शाळा घोनाड येथे विशेष वार्षिक शिबिराचे आयोजन दि. 05 जानेवारी ते 11 जानेवारी 2025 दरम्यान करण्यात आले आहे. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करतांना खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की, प्रशासकीय महाविद्यालयातील विद्यार्थी हे भविष्यात चांगले अधिकारी घडतीलच परंतु या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातून सामाजिक सेवेचे मूल्य अंगीकारून भविष्यातील प्रशासकीय सेवेसोबत सामाजिक सेवांचे मूल्य अंगीकारतील. या सात दिवसीय शिबिरातून आपल्या सुप्तगुणांना वाव देऊन आपल्या अंगी असणारे कला कौशल्य दाखवण्याची संधी हे शिबिर विद्यार्थ्यांना देणार आहे. त्यामुळे या शिबिरातील प्रत्येक कार्यक्रमात आपण सहभाग नोंदवावा असे आवाहन देखील विद्यार्थ्यांना केले आहे. या सात दिवसात गावकऱ्यांनी देखील विद्यार्थ्यांशी स्नेह जोपासावा असे मत देखील खासदार धानोरकर यांनी व्यक्त केले.



यावेळी मंचावर दिलीप चौधरी, घोनाड चे उपसंरपंच प्रशांत बोंडे, बबनराव खरोडे, ग्रामपंचायत सदस्य ज्योती उरकुंडे, आशा उरकुंडे, शाळा सुधार समितीचे अध्यक्ष प्रवीण आवारी, मनोहर पावडे, पांडुरंग मत्ते, पंढरीनाथ बोंडे, स्नेहल राऊत यांसह सर्व प्राध्यापक, प्रतिष्ठीत नागरीकांची व विद्यार्थ्यांची प्रामुख्याने उपस्थित होते.
Previous Post Next Post