विसापूरातील नळ - सेवा तात्काळ सुरू करून द्या.
संदीपभाऊ पोडे यांच्या मार्गदर्शनात चेतनभाऊ पाल यांनी दिला वीसापुर ग्रामपंचायत कडे निवेदन
विसापूर वासियान करिता नळ सेवा हा खूप मोठा प्रश्न उद्भवलेला आहे, प्रत्येक दोन ते चार महिन्याचा कालावधीनंतर विसापूर येथील नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावं लागतो, हे चित्र पाहता या आधी देखील विसापुरातील भारतीय जनता पक्षाचे नेते श्री. संदीप भाऊ पोडे व त्यांचे सहकारी सौरभ जी गिरसावळे, चेतन जी पाल, कार्तिक जी ठुसे , प्रफुल जी गौरकार, व सर्व भाजपा युवा कार्यकर्ते यांनी पाण्याकरिता रस्त्यावर उतरून ग्रामपंचायत विरोधामध्ये आंदोलन देखील केले होते. करिता चेतन जी पाल यांनी विसापूर मधील नळ सेवा गेल्या अनेक दिवसा पासून बंद आहे. त्या मुळे नागरिकांना अत्यंत त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायत कार्यालय विसापूर कडे विनंती करत की लवकरात लवकर नळ सेवा सुरु करण्याचे करावे या प्रकारची मागणी संदीप भाऊ पोळे यांच्या मार्गदर्शनात ग्रामपंचायत कार्यालयाकडे निवेदन देऊन केलेली आहे, यासमोर देखील पाण्याकरिता नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागेल काय हा प्रश्न नागरिकांच्या मनामध्ये आलेला आहे.
Tags
Ballarpur