सरकारी कंपन्याच घाट्यात का?
खासदार धानोरकरांचा दूरसंचार मंत्र्यांना लोकसभेत प्रश्न.
संसदेचे हिवाळी अधिवेशन दिल्ली येथे सुरु असून खासदार प्रतिभा धानोरकर ह्या विविध प्रश्नांच्या माध्यमातून सरकार चे लक्ष वेधत आहे. एकीकडे सरकारी दुरसंचार कंपनी बीएसएनएल ही घाट्यात असून इतर खाजगी कंपन्या कसा फायदा कमवतात असा प्रश्न खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्र सरकार विचारला आहे.
एकीकडे दूरसंचार क्षेत्रातील जीओ, एअरटेल, व्ही.आय. या खाजगी कंपन्या अमाप पैसा कमवत असून दुसरीकडे देशभर इन्फ्रास्ट्रक्चर तयार असलेली दुरसंचार क्षेत्रातील सर्वात जुनी कंपनी बीएसएनएल हि तोट्यात असल्याचा आरोप खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सरकार कडे केला आहे. बीएसएनएल मधील कर्मचाऱ्यांचे वेतन देखील निघण्याइतपत फायदा सरकारी कंपनी असलेल्या बीएसएनएल ला होतो का असा प्रश्न त्यांनी दुरसंचार मंत्री ज्योतीरादित्य सिंधीया यांना संसदेत विचारला. त्यासोबतच इतर कंपन्या कसा फायदा मिळवतात, ते बीएसएनएल ला का शक्य होत नाही असा प्रतिप्रश्न देखील खासदार धानोरकर यांनी मंत्री महोदयांना विचारला. यावर ज्योतिरादित्य सिंधीया यांनी मागील काही महिन्यांत बीएसएनएल चे ग्राहक वाढले असल्याचे सांगितले व सेवा उत्तम देत असल्याचे सांगुन भविष्यात फायदा कमावण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जातील अशी ग्वाही मंत्री महोदयांनी दिली. यावर खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दुरसंचार क्षेत्रातील इतर कंपन्यांशी स्पर्धा करुन बीएसएनएल ला फायदा मिळेल यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी विनंती देखील खासदार धानोरकर यांनी यावेळी मंत्री महोदयांकडे केली.
Tags
दिल्ली