मणिपूर घटनेवर प्रधानमंत्री गप्प का ? - खासदार प्रतिभा धानोरकर

मणिपूर घटनेवर प्रधानमंत्री गप्प का ? - खासदार प्रतिभा धानोरकर


संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षाने सरकार ला कोंडीत पकडले. विरोधी पक्षाने मणिपूर च्या घटनेवर चर्चा करावी अशी मागणी केली होती. परंतु, सरकार ने या विषयी आपली भुमीका स्पष्ट केली नाही. बांग्लादेशातील हिंदुं वर होण्याऱ्या अत्याचारा संदर्भात आपली भुमिका स्पष्ट करणारे हे सरकार मणिपूर च्या घटनेवर एकही शब्द बोलत नाही. या संदर्भात इंडिया आघाडी ने आज दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर आंदोलन करुन आपली भुमिका स्पष्ट केली.


खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना भेटून संबल, मणिपूर या प्रकरणावर संसदेत चर्चा करण्याकरीता वेळ मागितली. परंतु विरोधकांचे हे विषय सरकार ला गंभीर वाटत नसल्याची खंत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर सुरु असलेल्या आंदोलनात व्यक्त केली. हे सरकार विरोधकांचे आवाज दाबण्याचे काम करीत असल्याचे मत खासदार धानोरकर यांनी व्यक्त केले.




 मणिपूरात महिलेची नग्न धिंड काढली जाते यावर एकही शब्द बोलायला हे सरकार तयार नाही. देश सेवा करणाऱ्या सैनिकाच्या पत्नीचे अवमान होऊन देखील हे सरकार संसदेत चर्चा करीत नसेल तर या सरकार चा जेवढा निषेध व्हावा तेवढा कमीच असल्याचे मत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी यावेळी व्यक्त केले. सरकार ने विरोधकांना डावलून लोकशाही चा अंत करु नये व हुकुमशाही कडे आणू नये, असे मत देखील खासदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले.
Previous Post Next Post