जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग बांधवांना साहित्य वाटप.
चंद्रपूर फेरो ऐलाॅय संयंत्र चा उपक्रम
जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, चंद्रपूर फेरो ऐलाॅय संयंत्र च्या सीएसआर निधी अंतर्गत तसेच जिल्हा समाज कल्याण कार्यालय, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, दिव्यांग कौशल्य विकास मल्टीपर्पज सोसायटी व अल्मिको यांच्या संयुक्त प्रयत्नाने दिव्यांग बांधवांना उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून श्री संजय कुमार गजभिये एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर सीएफपी तसेच अतिथी म्हणून श्री बी. एम. मोहरकर, श्री बी यशवंता, श्री राजेश गायकवाड, श्री सी.एम पोडे, श्री अरिंदम डे व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी दिव्यांग बांधवांना कुबडी, सायकल, श्रवण यंत्र, स्मार्ट केन, एलबोस्टिक, साधी स्टिक, व्हील चेअर आणि बॅटरी ऑपरेटेड सायकल, इत्यादी साहित्याचा वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन चंद्रपूर फेरो ऐलाॅय संयंत्र चे डीजीएम उमेश उके यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता अल्मिको चे डॉ. रोहिणी करांडे, दिव्यांग कौशल्य विकास संस्थेचे निलेश पाझारे, टाटा हॉस्पिटलचे डॉ. आशिष बारबदे, रेडक्रॉस चे डॉ पियुष मेश्राम, मुन्ना खोब्रागडे,कल्पना शिंदे, यांनी प्रयत्न केले. यावेळी भास्कर कांबळे, सतीश मूल्लेवार, रवींद्र उपरे, सुभाष मोहुर्ले, उत्तम साव, अर्पिल चौधरी, पुष्पा सावसाकडे, ललिता खोब्रागडे, किरण कांबळे, इत्यादींचे सहकार्य लाभले.
Tags
Chandrapur