*गोपाळराव वानखेडे विद्यालयात रोटरी क्लब तर्फे करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन*

गोपाळराव वानखेडे विद्यालयात रोटरी क्लब तर्फे करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन



चंद्रपूर: रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी चंद्रपूर तर्फे गोपाळराव वानखेडे विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय नांदगाव पोडे येथे विद्यार्थ्यांकरिता करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे राज्य पुरस्कार प्राप्त प्राचार्य नरेंद्र बोबडे यांचे अध्यक्षतेखाली ,मुख्य मार्गदर्शक चंद्रपूर चे प्रसिद्ध डॉक्टर किरण देशपांडे,डाँ प्रमोद बांगडे,रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी च्या अध्यक्ष चंदाताई खांडरे  यांचे उपस्थितीत करण्यात आले.




याप्रसंगी डाँ देशपांडे यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा, ताणतणाव ,एकाग्रता,इयत्ता 10 वि,12 वि नंतर काय?विद्यार्थ्यांनी पुढील शिक्षणासाठी कोणत्या क्षेत्राची निवड करायची याबद्दल विशेष मार्गदर्शन केले ,यावेळी डाँ प्रमोद बांगडे,चंदाताई खांडरे ,प्राचार्य नरेंद्र बोबडे यानी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परीक्षा प्रमुख सारिका कुचनकर यांनी तर आभार प्रा दिपक तुरानकर यांनी मानले.
Previous Post Next Post