लोकसभेत विविध प्रश्नांच्या माध्यमातून खासदार धानोरकरांनी वेधले केंद्र सरकार चे लक्ष.

लोकसभेत विविध प्रश्नांच्या माध्यमातून खासदार धानोरकरांनी वेधले केंद्र सरकार चे लक्ष.



दिल्ली : 25 नोव्हेंबर पासून लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी विविध प्रश्नांच्या माध्यमातून केंद्र सरकार ला धारेवर धरले आहे.

लोकसभेच्या दिल्ली येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात विविध प्रश्नांच्या माध्यमातून सर्व सामान्यांचे प्रश्न अधिवेशनात मांडले. यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांना तात्काळ विज उपलब्ध करुन देण्याच्या संदर्भात सरकारची काय योजना आहे, या संदर्भा विचारना करण्यात आली. त्यासोबतच महिला सुरक्षेच्या संदर्भांने राष्ट्रीय महिला आयोगाने महिलांवर होणाऱ्या अत्याचारांसदर्भात केलेल्या उपाययोजना संदर्भात प्रश्नाद्वारे खासदार धानोरकर यांनी सरकाराला विचारणा केली. त्यासोबतच देशात सौरउर्जेसंदर्भात विदेशी गुंतवणुकीसंदर्भात केंद्र सरकार ला विचारणा करण्यात आली. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी अत्यल्प मजुरीवाली कुटूंबे आणि वाढती महागाई याचा मेळ सरकार कसा घालणार असा प्रश्न विचारत सकल घरगुती उत्पन्न कमी झाल्याचे केंद्र सरकार ला निदर्शनास आणून दिले. यासंदर्भात शासनाने मजुरांच्या दरडोई उत्पन्नात वाढ करण्यासाठी उपाययोजना कराव्या अशी मागणी देखील खासदार धानोरकर यांनी केंद्र सरकार कडे केली.
Previous Post Next Post