संदीप पोडे यांची भाजपा यु. मो. जिल्हा सरचिटणीस ( जिल्हा महामंत्री ) पदी नियुक्ती
चंद्रपूर :- वन व सांस्कृतिक कार्य मंत्री, महाराष्ट्र शासन व पालक मंत्री चंद्रपूर, सुधीर भाऊ मुनगंटीवार, यांच्या शिफारशीवरून विसापूर चे युवा नेते संदीप पोडे यांची भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपूर चे जिल्हा सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. स्वयं सुधीरभाऊ व महेश देवकाते जिल्हाध्यक्ष भा.ज.म. यांनी संदीप यांना नियुक्ती पत्र दिले.यापूर्वी पोडे यांनी लोकसभा निवडणुकीत व संघटनेतील उत्कृष्ट कार्य पाहून त्यांची पदोन्नती केली संदीपच्या अथक परिश्रमामुळे जिल्ह्यातील विशेषत: विसापूर, बल्लारपूर विधानसभा व तहसीलमध्ये युवा मोर्चाला बळ मिळेल, असे मत जिल्हा सरचिटणीस संदीप पोडे यांनी व्यक्त केले. हंसराज भैय्या अहिर, अजय दुबे प्रदेश उपाध्यक्ष भाजपा कार्यकर्ता, जिल्हाध्यक्ष भाजपा हरीश शर्मा आदींनी आभार व्यक्त केले.
Tags
Ballarpur