डॉ.अभिलाषा ताई गावतुरे बल्लारपूर मुल विधानसभेच्या उमेदवार यांचा प्रचाराचा झंजावात

डॉ.अभिलाषा ताई गावतुरे बल्लारपूर मुल विधानसभेच्या उमेदवार यांचा प्रचाराचा झंजावात



बल्लारपूर :- आज बल्लारपूर येथील मंगलमूर्ती लॉन मध्ये हजारो लोकांच्या उपस्थितीत प्रचार शुभारंभाची सभा उत्साहात संपन्न झाली प्रचंड जनसमदायाच्या उपस्थितीमध्ये बल्लारपूर मूल बल्लारपूर विधानसभा क्षेत्राच्या लोकप्रिय उमेदवार डॉक्टर अभिलाषा ताई गावतुरे यांच्या प्रचारासाठी तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील हजारोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

गेल्या पंधरा वर्षापासून करीत असलेली निस्वार्थ समाजसेवा शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक आणि वैद्यकीय क्षेत्रात दिलेली निस्वार्थ सेवा यामुळे बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात अभिलाषा ताई गवतुरे यांना प्रचंड जन समर्थन मिळत आहे समाजातील विविध क्षेत्रातील विविध सामाजिक संघटना विविध राजकीय पक्षांचे नेते आणि पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे जोरदार समर्थन डॉक्टर अभिलाषा ताई गवतुरे यांना मिळत आहे विविध राजकीय पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी पक्षभेद बाजूला सरवण डॉक्टर अभिलाषा ताई गौतरे यांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहेत बल्लारपूर येथे झालेल्या सभेमध्ये
राष्ट्रीय कुणबी महासंघाचे जिल्हा सचिव श्री अतुल ठाकरे यांनी डॉक्टर अभिलाषा ताई गवतुरे यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे नीरज वाळके यांनी कुठल्याही पक्ष धोरणाची तमा न बाळगता फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील प्रमाणात कार्य डॉक्टर म्हणून पाठिंबा जाहीर केला आणि प्रचार करण्यासाठी सज्ज झाले जुना चे सरपंच विवेक शेंडे कारव्याचे माजी पंचायत समिती सदस्य विनोद सीडाम गोंडवाना गणतंत्र पार्टीचे गणपत नैताम नथू पाटील वांढरे अमन पसंत कमिटीचे ताहीर भाई हुसेन अतिक भाई शेख बशीर खान शेख जाकीर गणेश जी बुटले गवारी समाज संघटनेचे सतीशजि नेवारे चिचपल्ली चे संतोष भाऊ तोडासे सुनील बावणे मनोराचे मोहन पवार कोर्टी मक्त्याचे साईनाथ तायडे कोटीचे रवींद्र भाऊ टोंगे बामणीच्या तंजीला सय्यद मॅडम करुणाताई शेगोकार नाहिद हुसेन तुळशीराम कंबलवार विसापूरचे अशोक भाऊ चिताडे आणि राजूभाऊ लांडगे इत्यादी सर्व मान्यवर मंचावर होते आणि कोणत्याही पक्षाने अभिलाषा ताईंना तिकीट दिली नसेल तरी आम्ही जनतेने अभि लक्ष त्यांना तिकीट दिली आहे अशी घोषणा सर्व उपस्थित मान्यवरांनी केली आणि अभिलाषाताई गावतुरे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्यासाठी तन-मन-धनाने सहकार्य करण्याची ग्वाही सुद्धा दिली.

ज्यावेळी डॉक्टर अभिलाषा ताई गावतुरे यांनी उमेदवार म्हणून बोलताना मुल बल्लारपूर विधानसभा क्षेत्रामध्ये गेल्या 30 वर्षांमध्ये विद्यमान पालकमंत्र्यांनी कुठलेही जनहिताचे काम केले नाही आणि विकासाच्या नावाखाली स्वतःच्या कंत्राटदारांना पोचण्यासाठी फक्त दगड धोंड्याच्या बिल्डिंग बनवण्याचं काम केलं ना पालकमंत्र्यांचा इथल्या शाळांकडे लक्ष आहे ना येथील दवाखान्यांमध्ये सोयी सुविधा उपलब्ध आहेत ना कोणत्या नवीन उद्योग सुरू केला ना कुठल्या नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या उलट सुरू असलेल्या बामणी प्रोटीन सारख्या उद्योगाला सुद्धा बंद होण्यापासून ते रोखू शकले नाही असा आरोप त्यांनी केला शाळांमध्ये शिक्षक नाही म्हणून आम्ही आंदोलन करतो जिल्हा परिषद च्या शाळा सरकार बंद करत असताना आम्ही त्याविरुद्ध आवाज उचलतो विद्यार्थ्यांना शाळेत जायसाठी बस नाही म्हणून आम्ही आंदोलन करतो आमच्या शेतकऱ्यांच्या आणि गुराख्यांचे जीव वाघांच्या हल्ल्यामध्ये जातात म्हणून आम्ही आवाज उचलतो पण पालकमंत्र्यांना आमच्या सर्वसामान्य माणसांच्या जीवाची अजिबात फिकीर नाही आंबडीची सिंचन योजना गेल्या 30 वर्षात पूर्ण करू शकले नाही शेतकऱ्यांच्या मामा तलावाच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याने आठवण मधले तलाव फुटले शेकडो लोक बेघर झाले आणि लाखोंच्या संपत्तीचे नुकसान झालं यासाठी आम्हाला लढावे लागते पण ज्यांना जनप्रतिनिधी म्हणून निवडून दिले असे जिल्ह्याचे पालकमंत्री याबाबत अक्षम्य उदासीनता बाळगतात आणि म्हणून या सर्वसामान्य जनतेच्या समस्या जर सोडवायचे असतील तर आम्हाला थंड बहुमताने निवडून द्या असे आवाहन अभिलाषा ताई गावतुरे यांनी केले कार्यक्रमाचे संचालन रवी देवगडे विजय मुसळे यांनी केले तर प्रस्तावना भूमिपुत्र ब्रिगेडचे ताहीर भाई हुसेन यांनी केली.
Previous Post Next Post