विरोधकांच्या अपप्रचारास जनता बळी पडणार नाही. - प्रविण काकडे
वरोरा भद्रावती विधानसभेतील प्रचार शिगेला पोहोचला असून सर्वच उमेदवार प्रचारात व्यस्त झाले आहे. सर्वच उमेदवार प्रचारादरम्यान एकमेकांवर टिका करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. महाविकास आघाडीचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार प्रविण काकडे यांनी प्रचारादरम्यान विरोधकांचा चांगलाच समाचार घेतल्याचे दिसून येत आहे.
माजरी, भद्रावती येथील प्रचारादरम्यान त्यांनी विरोधकांवर टीका केली आहे. विरोधक फक्त अपप्रचार करीत असतांना दिसून येत आहे. मात्र आम्ही नेहमी विकासाचे राजकारण केले आहे. मागील दहा वर्षांत केलेल्या विकास कामांची यादी देऊन मत मागत आहे. तर विरोध अपप्रचार करुन जनतेची दिशाभूल करीत आहे.
वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील जनता विरोधकांच्या अपप्रचाराला कधीही बळी पडणार नाही अस मत महाविकास आघाडीचे उमेदवार प्रविण काकडे यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडीत अडीच वर्षाचा कार्यकाळ नागरिकांनी बघितला असून येत्या 20 नोव्हेंबर रोजी क्षेत्रातील विकासासाठी मला निवडून देतील असा विश्वास देखील यावेळी प्रविण काकडे यांनी व्यक्त केला. प्रचारादरम्यान त्यांनी माजरी, भद्रावती, कुचना, ऑर्डन्सस् फॅक्टरी वसाहत, घोडपेठ या ठिकाणी भेटी देऊन नागरीकांशी संवाद साधला.
Tags
warora