*चंद्रपुर येथे वीर बाबुराव शेडमाके यांचे शहीद दिन साजरा..*

चंद्रपुर येथे वीर बाबुराव शेडमाके यांचे शहीद दिन साजरा


चंद्रपूर : आज दिनांक 21/10/2024 ला चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटी तर्फे 1857 च्या उठावातील योद्धा क्रांतिवीर बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके यांच्या शहीद स्थळावर गोंडवाणा प्राण हितेचा पुत्र शहीद वीर बाबूराव शेडमाके यांची 167 व्या शहिद दिनानिमित्य स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.




शहीद क्रांतिवीर बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले. पेरसापेन सुमरण व बाबूराव शेडमाके यांचा रेला पाटा म्हणून त्यांच्या कार्याची आठवण करण्यात आली. ‘बाबूराव शेडमाके अमर रहे, अमर रहे’ असा जयजयकार करीत आदरांजली वाहण्यात आली.



सर्वप्रथम मान्यवरांच्या शुभहस्ते वीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलित व पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष आदिवासी समाज गुंजन येरमे यांनी, वीर बाबुराव शेडमाके हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी इंग्रजांविरुद्ध उठून पेटले होते. आदिवासी समाजातील क्रांतिकारक थोर महात्म्यांनी देशासाठी किंबहुना आदिवासी समाजासाठी बलिदान व प्राणाची आहुती दिले असून अशा थोर क्रांतिकारक महापुरुषांची प्रेरणा घेऊन त्या दिशेने वाटचाल करण्याचे आवाहन करून आदिवासी समाजच या देशाचे मूळनिवासी असल्याने विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे म्हणत मोलाचे मार्गदर्शन केले.


यावेळी राजू भाऊ झोडे, हनुमान भाऊ चौके व चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष आदिवासी समाज गुंजन येरमे, माजी नगसेवक बापू अंसारी व काँग्रेसच्या आदिवासी समाज महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
उपस्थित सर्वांनी वीर बाबुराव शेडमाके यांच्या कार्याला उजाळा दिला. सर्वांनी पुष्पमाला व फुले वाहून विनम्र अभिवादन केले.
Previous Post Next Post