*चंद्रपूर जिल्ह्यात प्रदूषण वाढवणाऱ्या वाहतूक कंपन्यांवर कडक कारवाई करा - चांदा पॉवर ऑफ़ यूथ फाउंडेशन चंद्रपूर*


चंद्रपूर जिल्ह्यात प्रदूषण करणाऱ्या कोळसा वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई करा, अन्यथा आपल्या कार्यालयात टाळे ठोक आंदोलन करु, मनीष दास यांचा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला इशारा।



चंद्रपूर जिल्ह्यात कोळशाची वाहतूक करणाऱ्या बहुतांश कंपन्या जुनी वाहने वापरत आहेत. काही रुपये खर्चून खोटे पीयूसी. (P.U.C.) तयार केले आहे. चंद्रपूरच्या जनतेच्या आरोग्याशी खेळला जात आहे. भ्रष्टाचार करणारी यंत्रणा गप्प आहे. पण एक जबाबदार सामाजिक संस्था म्हणून आम्ही या अनैतिक आणि अमानवी कृत्याला विरोध करतो. चंद्रपूर जिल्ह्यात प्रदूषण वाढवणाऱ्या वाहतूक कंपन्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी "चांदा पॉवर ऑफ़ यूथ फाउंडेशन चंद्रपुर" यांनी निवेदन द्वारा केलेली आहे. अन्यथा आमची संघटना आंदोलन करेल, आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या चंद्रपूर कार्यालयात `टाळे ठोक आंदोलन’ करण्यात येणार आहे, अशा इशारा फाउंडेशन चे अध्यक्ष मनीष दास यांनी केलेले आहे।
निवेदन देताना फाउंडेशनचे बादल डे, श्रीनिवास कन्नूर, सिकंदर मंडल, प्रथम येल्लेवार, अमर विश्वास, उपस्थित होते.


Previous Post Next Post