*छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अवमानाच्या विरोधात निषेध मोर्चा..*

◼️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अवमानाच्या विरोधात निषेध मोर्चा..


चंद्रपूर:- राजकोट, सिंधुदुर्गमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. या घटनेचा संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडून विरोध होत आहे.





  छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाच्या विरोधात 4 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून चंद्रपूर येथील जिल्हा दंडाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चाला शिवरायांच्या चाहत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संजय दिगंबर रत्नपारखी यांनी केले आहे.
Previous Post Next Post