चंद्रपुरात भव्य मशाल रॅली
राज्यात शक्तिकायदा लागू करा - खासदार प्रतिभा धानोरकर यांची मागणी
चंद्रपूर :- राज्यातील महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर महिला व मुलींना सुरक्षित ठेवण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात मशाल रॅली काढण्यात आली.
आयोजित रॅलीत खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुधाकर अडाबळे, आमदार किशोर जोरगेवार यांच्यासह शहरातील विविध सामाजिक संघटना सहभागी झाल्या होत्या. महिलांच्या हातात धगधगत्या मशाली होत्या, आपण सर्वजण एकत्र आहोत, आपल्या माता, बहिणी, मुलींची सुरक्षा आपल्या हातात आहे, अशी भावना मनात निर्माण व्हावी, हाच आजच्या रॅलीचा उद्देश आहे शहरातील प्रियदर्शनी इंदिरा गांधी चौकात पोहोचून उपस्थित नागरिक व महिलांच्या सुरक्षेची शपथ घेण्यात आली.
यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की, आम्ही राज्यात शक्तीकायदा अस्तित्वात आणला मात्र अद्यापही त्याची अंमलबजावणी झालेली नाही, या कायद्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
जागृती मशाल मंचच्या सदस्या सामाजिक कार्यकर्त्या पारोमिता गोस्वामी म्हणाल्या की, आज आम्ही महिला सुरक्षेची मशाल पेटवली आहे, ती यापुढेही पेटत राहील, महिला व मुलींवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आमचा प्रयत्न राहील, असे अश्विनी खोब्रागडे यांनी सांगितले आम्हाला चांगला स्पर्श, वाईट स्पर्श, संध्याकाळी लवकर घरी येण्याचे ज्ञान फक्त मुलींनाच दिले जात होते पण आता सर्व मुलांनाही सांगणे गरजेचे आहे, तरच समाजात खरी जागृती येईल.
चंद्रपूर जागृती मशाल मंचचा मोर्चा यशस्वी करण्यासाठी पारोमिता गोस्वामी ताई, अश्विनी खोब्रागडे ताई, एड प्रितीशा साहा, एड वर्षा जामदार, प्रा. ज्योती राखुंडे, डॉ.जयश्री कापसे, एड तबस्सुम शेख, नेहा शंकर, मुन्नी बाजी, सुरेखा चिडे, संजीवनी कुबेर, शरयू कुबेर ताई तसेच प्रलय, जगदीश आणि अनिकेत यांनी परिश्रम घेतले.
Tags
Chandrapur