*महिला सुरक्षेसंदर्भात प्रत्येक राज्याने कडक कायदे करावे. - खासदार प्रतिभा धानोरकर..* *कलकत्ता येथील घटनेचा निषेध करीत त्वरीत न्यायासाठी खासदारांचे पंतप्रधानांना पत्र.*

◼️महिला सुरक्षेसंदर्भात प्रत्येक राज्याने कडक कायदे करावे. - खासदार प्रतिभा धानोरकर..

◼️कलकत्ता  येथील घटनेचा निषेध करीत त्वरीत न्यायासाठी खासदारांचे पंतप्रधानांना पत्र.




चंद्रपूर:- 9 ऑगस्ट  कलकत्ता  येथील मेडीकल कॉलेज मध्ये घडलेली घटना निंदनिय असून आरोपींवर कडक कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तथा गृह मंत्री अमित शाह यांचे कडे केली आहे.

कलकत्ता येथील घटना मन हेलावणारी असून या घटनेचा कितीही निषेद केला तरी कमी आहे. या घटनेच्या संदर्भाने पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून यासाठी प्रत्येक राज्याने देखील प्रयत्न केला पाहिजे. यासंदर्भात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तसेच आरोग्य मंत्री जे.पी. नढ्ढा यांना प्रत्र लिहून आरोग्य यंत्रणेला सुरक्षा प्रदान करुन आरोपींना देखील कडक सजा व्हावी अशी भावना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पत्रातून व्यक्त केली आहे.
महिला ह्या प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत. देशाच्या विकासात महिलांचा वाटा मोठा आहे परंतु त्या जर सुरक्षी राहील्या नाही. तर देशात अराजकता निर्माण होईल. याकरीता प्रत्येक राज्यातील सरकार ने देखील तसेच सरकार ने देखील महिला सुरक्षेसंदर्भात कडक कायदे करावेत, असे मत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले आहे. महाराष्ट्र राज्यात महिला सुरक्षेसंदर्भात शक्ती कायदा लागू करण्याकरीता खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आमदार असतांना विधानसभेत मागणी केली होती. वरील प्रकरणी केंद्र सरकार ने दखल घेऊन तत्काळ कार्यवाही करावी अशी मागणी खासदार प्रतिभा धनोरकर यानी केली आहे.
Previous Post Next Post