छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यातील भ्रष्टाचाराप्रकरणी चंद्रपुर शहर जिल्हा युवक कॅांग्रेस अध्यक्ष राजेश मुरली अडुर यांचा नेतृत्वात सरकार चा प्रतीकात्मक पुतळा जाळून तीव्र नारेबाजी करित बंगाली कैम्प रोड चंद्रपुर हैदराबाद हायवे इथे सरकराचा केला निषेध.
डिसेंबर 2023 मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. मात्र दिनांक २६ ऑगस्ट रोजी महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा अवघ्या ८ महिन्यांच्या कालावधीमध्ये कोसळला. महाराष्ट्रा करिता ही अतिशय शरमेची बाब असून या घटनेमुळे तमाम शिवप्रेमींमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. केंद्रातील भाजप सरकार व महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकार भ्रष्टाचाराने बरबटलेले आहे. संपूर्ण देशात दररोज कुठे ना कुठे रस्त्यांना व पुलांना तडे जात आहेत, तर कुठे विमानतळाला गळती लागली आहे. महाराष्ट्रात महायुतीचे तिघाडी सरकार सत्तेत आल्यापासून सगळ्या निविदा प्रक्रियांमध्ये कमिशनखोरीचे पेव आले असून टक्केवारी घेऊन बांधकामाची कंत्राटे देण्यात येत आहे. आता तर या जगात महाराष्ट्राची ओळख असणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार करण्यापर्यंत यांची मजल गेलेली असून निकृष्ट दर्जाचे पुतळा उभारण्याची या सरकारची हिम्मत झाली आहे. या पुतळ्याची उभारणी होत असताना महाराष्ट्र सरकारचे कला संचालनालय विभाग झोपा काढत होते का? तसेच पुतळा उभारण्याचा कुठलाही अनुभव नसलेल्या व्यक्तीला हे काम कुणाच्या शिफारशीवरून देण्यात आले आहे?याची सुद्धा सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. दोषींवर दिखाव्यापूरती कारवाई न करता या घटनेच्या मुळाशी जाऊन महाराष्ट्राच्या या मानहानीला जबाबदार असणाऱ्या सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी व शिवरायांच्या नावाने राजकारण करणाऱ्या राज्यकर्त्यांनी जनतेची माफी मागायला हवी. शिवरायांच्या पुतळा उभारण्यात दिलेल्या भ्रष्टाचार म्हणजे या सरकारच्या भ्रष्ट कारभाराचा कळस असून महाराष्ट्रातील जनता यांना येत्या निवडणुकीत नक्कीच धडा शिकवणार आहे.
आंदोलन वेळी प्रदेश सचिव रमीज़ शेख,अजय चिन्नुरवार,मोनु रामटेके,प्रवीण अडुर,सुमित चंदनखेडे,प्रकाश देशभ्रतार,श्रीकांत अडुर,रघु रामगिरी,मनिष अडुर,निखिल अडुर,शंकर अडुर,साहिल लदवे,अनु तलारी,राजु श्रीमुला,सहित मोठ्या संख्येने युवक कांग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.
Tags
Chandrapur