*नागरिकांच्या समस्या बाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता प्रशांत भारती यांचे धूळ फेको आंदोलन...*

◼️नागरिकांच्या समस्या बाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता प्रशांत भारती यांचे धूळ फेको आंदोलन...


चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील तुकुम परिसरामध्ये बांधकाम विभागाच्या गलथान कामामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धुळ उडत असते त्यामुळे तिथे राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होत असून वारंवार सूचना केल्यानंतर बांधकाम विभागामार्फत याची दखल घेतल्या जात नसल्याकारणाने नागरिकांच्या समस्या जाणून घेत इंटक युवक काँग्रेसचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष प्रशांत भारती यांच्या नेतृत्वात आज मातोश्री चौक तुकुम येथे स्वतःच्या अंगावर धुळ फेकत अभिनव आंदोलन करीत प्रशासनाचे लक्ष वेधून निषेध करण्यात आले. 








आणि जर येणाऱ्या काळात तुकुम क्षेत्रातील मुख्य मार्गावरील रस्त्यावरील खड्डे आणि उडणाऱ्या धुळीचा प्रश्न सोडवण्यात आला नाही तर संबंधित अधिकाऱ्यांच्या अंगावर धूळ फेकुन निषेध करण्यात येईल असा इशारा प्रशांत भारती यांच्यामार्फत देण्यात आले सदर आंदोलनात ग्रामपंचायत सदस्य सागर तुरक, रवी दुर्गे,अभय गेडाम साहिल शेख जावेद देशमुख कार्तिक डोनीवार आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती..


Previous Post Next Post