*अखेर वाहनांवरील विलंब शुल्क वाढीला स्थगिती.* *खासदार धानोरकर यांच्या पाठपुराव्याला यश.*

अखेर वाहनांवरील विलंब शुल्क वाढीला स्थगिती.
खासदार धानोरकर यांच्या पाठपुराव्याला यश.


महाराष्ट्र सरकार च्या परिवहन विभागाने लागु केलेल्या विलंब शुल्क संदर्भात खासदार प्रतिभा धानोरकर यांच्याकडे निवेदनातून विलंब शुल्क माफ करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यासंदर्भाने खासदार धानोरकर यांनी पाठपूरावा करुन सदर विलंब शुल्क मागे घेण्याची मागणी शासनाकडे केली होती. त्याला यश प्राप्त झाले असून पावसाळी अधिवेशनात या संदर्भाने वाहनांवरील विलंब शुल्काला स्थगिती देण्यात आली आहे.



खासदार प्रतिभा धानोरकर या नागरीकांच्या समस्या सोडविण्याकरीता अग्रेसर असून अलिकडेच 15 वर्षाच्या वाहन योग्यता नुतनीकरणासाठी प्रतिदिवस 50 रुपये एवढे विलंब शुल्क परिवहन विभागातर्फे आकारण्यात आले होते. या संदर्भात खासदार प्रतिभा धानोकर यांच्या कडे अनेक ऑटो चालक-मालक संघटना सोबतच विविध परिवहन संवर्गातील वाहन संघटनांनी निवेदन देऊन सदर समस्येवर तोडगा काढण्याची विनंती केली होती. या संदर्भात खासदार धानोरकर यांनी महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाच्या सचिवांशी तसेच मंत्री महोदयांशी संपर्क करुन सदर विषयावर तोडगा काढण्याची विनंती केली होती. या संदर्भात खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या पाठपुराव्याला यश प्राप्त झाले असून मा. मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत वाहनांवरील विलंब शुल्क रद्द करण्याची घोषणा केली. 


या संदर्भात 11 जुलै रोजी शासन निर्णय जाहिर झाला असून वाहनांवरील विलंब शुल्काला समोरील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. या निर्णयामुळे अनेक वाहनधारकांचा प्रश्न मार्गी लागला असून अनेक वाहनधारकांचा आर्थिक बोजा दुर होणार आहे. या निर्णयामुळे वाहनधारकांच्या संघटनांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांचे आभार मानले आहे.
Previous Post Next Post