◼️युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत ०३ एप्रिल रोजी चंद्रपुरात.
◼️लोकसभा निवडणूक २०२४ उमेदवारच्या प्रचारार्थ कुणाल राऊत यांचा नियोजित दौरा.
चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा निवडणूक २०२४ निमित्त दि. ०३ एप्रिल २०२४ रोजी युवक काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत हे चंद्रपूर लोकसभा चे काँग्रेस चे अधिकृत उमेदवार प्रतिभाताई धानोरकर यांच्या प्रचारार्थ चंद्रपूर येथे येणार आहे. कुणाल राऊत दुपारी ०२.०० वा. नागपूर येथून चंद्रपूर कडे खाजगी वाहनाने प्रस्थान करणार दुपारी ०४.०० वा.चंद्रपूर येथे त्यांचे आगमन प्रित्यर्थ स्वागत व दुपारी ०४.१५वा. चंद्रपूर लोकसभा निवडणुक प्रचाराच्या संदर्भात युवक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची यंग रेस्टॉरंट, चंद्रपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तदनंतर ते सायं ०६.०० वा. चंद्रपूर येथून बल्लारपूर कडे वाहनाने प्रस्थान करतील व काँग्रेस पक्षाचे चंद्रपूर लोकसभेच्या अधिकृत उम्मेदवार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर यांचा प्रचारार्थ जाहीर सभेला सायं ०७.०० वा ग्रीन लॉनस, (उमीया रेस्टॉरंटच्या बाजूला, बल्लारपूर), संबोधित करणार आहे व तदनंतर सायं ०८.०० वा. बल्लारपुर येथून नागपूर कडे खाजगी वाहनाने प्रस्थान करतील अशी माहिती युवक काँग्रेस चे प्रदेश सचिव तथा जिल्हा चंद्रपूर चे प्रभारी फजलुर रहेमान कुरेशी यांनी दिली असून जिल्हयातील युवक काँग्रेस चे जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन ही केले आहे.
Tags
Chandrapur