*मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी घेतली अम्माची भेट....*

◼️मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी घेतली अम्माची भेट....


राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब हे चंद्रपूर दौ-यावर असतांना त्यांनी आमदार जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी पोहचत त्यांच्या मातोश्री अम्माची भेट घेतली. यावेळी पुष्पहार, शाल, श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत केले, सोबतच चंद्रपूर ची आराध्य दैवत माता महाकालीची मूर्ती भेट म्हणून दिली. 


यावेळी त्यांनी प्रामुख्याने आमदार जोरगेवार यांच्या मातोश्री यांची भेट घेतली. 2022 ला "मदर हु इंन्स्पायर पुरस्काराने अम्माला सन्माणीत करण्यात आले होते. तेव्हा मुख्यमंत्री यांनी व्हिडीओ कॉल वरुन शुभेच्छा दिल्या होत्या. तेव्हा अम्माने त्यांना घरी येण्याचे आमंत्रण दिले होते. त्यामुळे आज अम्माच्या भेटीला आलो असल्याचे ते म्हणाले. अम्मा ने सुरु केलेला अम्मा का टिफिन हा उपक्रम राज्यात चर्चेत आहे.


 अम्माने सुरु केलेले काम राज्यासाठी प्रेरणादाई आहे. यावेळी मुख्यमंत्री महोदय म्हणाले की आज अम्माची भेट घेता आली. त्यांचा आर्शिवाद घेऊन मुंबईला जात आहे. आता नव्या उर्जेने काम करणार !
Previous Post Next Post