*आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रयत्नांना यश. 61 अनुदानीत आश्रम शाळांची श्रेणी वाढ करण्यास मंत्री मंडळाच्या बैठकीत निर्णय..*

🔳आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रयत्नांना यश.
61 अनुदानीत आश्रम शाळांची श्रेणी वाढ करण्यास मंत्री मंडळाच्या बैठकीत निर्णय.



समाजातील विविध क्षेत्रातील नागरीकांना न्याय देण्याचा प्रयत्न आमदार प्रतिभा धानोरकर सतत करीत असतात. त्याचाच एक भाग म्हणून आदिवासी विभागाअंतर्गत असणाऱ्या शाळांमध्ये श्रेणी वाढ व्हावी या करीता आमदार प्रतिभा धानोरकर प्रयत्नशील होत्या. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून सोमवारी झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत आदिवासी विभागाच्या 61 अनुदानीत आश्रम शाळांची श्रेणी वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.


आदिवासी विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण कमी व्हावे तसेच मुला-मुलींमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण होऊन त्यांनी परिपुर्ण शिक्षक घ्यावे या करीता त्यांना जिथे शिक्षण घेत आहेत त्याच ठिकाणी समोरील शिक्षणाची संधी निर्माण व्हावी या करीता आमदार प्रतिभा धानोरकर यांनी माजी आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी तथा विद्यमान आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित साहेब वारंवार भेटून आदिवासी अनुदानित आश्रम शाळेत श्रेणी वाढ व्हावी अशी मागणी केली होती. त्यासोबतच अधिवेशनादरम्यान श्रेणी वाढ चा मुद्दा उपस्थित करुन सभागृहाचे लक्ष वेधले. त्यांच्या या प्रयत्नांना यश प्राप्त झाले असून सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे. लवकरच या संदर्भात शासन निर्णय जारी होईल. 17 उच्च प्राथमिक शाळांना माध्यमिक चा वर्ग जोडण्यात येईल तसेच 44 माध्यमिक शाळांना उच्च माध्यमिक चा वर्ग जोडण्यात येणार आहे. या निर्णयामुळे आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून अनुदानित आश्रम शाळा संस्था चालकांनी आमदार प्रतिभा धानोरकर यांचे आभार मानले आहे.
Previous Post Next Post