*राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अल्पसंख्यांक शहर जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर पदी बब्बू भाई इसा ह्यांची नियुक्ती*

🔳राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अल्पसंख्यांक शहर जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर पदी बब्बू भाई इसा ह्यांची नियुक्ती....


 चंद्रपूर :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा चंद्रपूर मध्ये बब्बू भाई इसा हे गेल्या अनेक वर्षा पासून कार्य करीत आहे व त्यांचे पक्षातील व सामाजिक कार्य बघता चंद्रपूर शहराचे जिल्हाध्यक्ष दीपक भाऊ जयस्वाल ह्यांनी बब्बू भाई इसा ह्यांची अल्पसंख्यांक शहर जिल्हाध्यक्ष पदीनियुक्ती करण्या करिता अल्पसंख्यांक प्रदेश अध्यक्ष जावेद हबीब साहेब शिफारस केली आणि आज ह्यांना दिनांक 17/2/24 ला माजी गृहमंत्री तथा  राष्ट्रवादी पक्षाचे नेते अनिल बाबू देशमुख साहेब यांच्या हस्ते नागपूर येथे  नियुक्तीपत्र देऊन बब्बू भाई इसा यांची अल्पसंख्याक विभागाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली त्यावेळेस राष्ट्रवादी पक्षाचे नेते तथा प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील साहेब, वसीम भाई, जलील भाई, बंडूजी साव, तथा असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.


 अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल बब्बू भाई इसा यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख साहेब, प्रदेशाध्यक्ष जावेद हबीब साहेब, तथा शहर जिल्हाध्यक्ष दीपक भाऊ जयस्वाल यांचे आभार मानले...
Previous Post Next Post