◼️संविधान दिनानिमित्त परिवर्तन योगा परिवार द्वारा संचालित आजाद गार्डन योगा ग्रुप तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन.
चंद्रपूर :- आज दिनांक 26-11-23 रोजी रविवारला संविधान दिनानिमित्त सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत चंद्रपूर शहरातील केंद्रस्थानी असलेल्या आजाद गार्डन येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर राबविण्यात आले. तसेच उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित योगसाधकाकडून संविधानिक उद्देशिका वाचून घेण्यात आली.
या कार्यक्रमाला प्रामुख्याने डॉ. अमित ढवस, प्रसिध्द फिजिशियन , डॉ प्रणाली ढवस बालरोग तज्ञ तथा डॉ. नितेश मल्लेलवार, संदीपभाऊ सोनाने, अशोक क्षीरसागर , परिवर्तन योगा परिवार चे संस्थपक शशीकांत म्हस्के , नरेंद्र निंबाळकर , गुलाम भाई शेख, रंजीत महाजन ,माया मेश्राम , पौर्णिमा चांदेकर तसेच बहुसंख्य योगसाधक व मान्यवर उपस्थित होते. संविधान व त्यामुळे मिळालेले अधिकार याबाबत योगा ग्रुप चे सदस्य श्री. संदीपभाऊ सोनोने यांनी मार्गदर्शन केले. डॉ. अमीत ढवस सर आणि डॉ. नितेश मल्लेलवार यांनी आपल्या टीमच्या मदतीने जवळपास 125 लोकांची निःशुल्क तपासणी करून त्यांना उपचार दिले व आहार व व्यायाम याबद्दल समजावून सांगितले व आरोग्य सेवा दिली. या संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन सौ. पोर्णिमा चांदेकर यांनी केले.तर परिवर्तन योगा परिवाराचे संस्थापक श्री. शशिकांत मस्के यांनी योगासंबधी मार्गदर्शन करून कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. पारिवर्तन योगा आज़ाद गार्डन चे मुख्य ट्रेनर गुलाम सर, रंजीत महाजन , नरेंद्रजी निंबाळकर, अशोक क्षीरसागर अशोक रामटेके , लूनावत सर,मेश्रामताई , बसंती बिस्वास,छाया ताई, ,ललिता ताई आणि संपूर्ण आजाद गार्डन योगा ग्रुप चे संपुर्ण सदस्य सहभागी होऊन आजचा आरोग्य शिबिर कार्यक्रम यशस्वी केला.
तसेच सरकार नगर व संकल्प योगा ग्रुप ने कुंदन खोब्रागडे यांच्या नेतृत्वाखाली आपली उपस्थिती दर्शवून या कार्यक्रमात सहभाग घेतला.
परिवर्तन योगा आज़ाद गार्डन टिम कडून सर्वांचे धन्यवाद मानले व शिबिराची सांगता करण्यात आली!
Tags
चंद्रपूर