🔴 बल्लारशाह ते मुंबई डायरेक्ट ट्रेन सुरु होईस्तोवर ट्रेन क्र. 51196 लिंक कोच पूर्ववत सुरु करण्याची मागणी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केली...
चंद्रपूर : जिल्ह्यातील आमदार प्रतिभा धानोरकर यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून बल्लारशाह ते मुंबई डायरेक्ट ट्रेन सुरु होईस्तोवर ट्रेन क्र. 51196 लिंक कोचेस पूर्ववत करण्याची मागणी केली आहे.
या पत्रात आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी म्हटले आहे की, कोरोना महामारीच्या काळात ही ट्रेन थांबली होती. देशभरात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात असून जनजीवन पुन्हा सुरू झाले आहे. पण ती गाडी असूनपर्यंत बंद आहे. ही गाडी चंद्रपूर जिल्ह्यातील प्रवाशांसाठी अतिशय सोयीची आहे. त्यामुळे बल्लारशाह-चंद्रपूर ते मुंबई ही थेट रेल्वे आठवड्यातून तीन वेळा सुरू होईपर्यंत लोकांच्या सोयीसाठी ही लिंक एक्स्प्रेस अगोदर सुरू करणे आवश्यक आहे.
आमदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या की, ही गाडी दोन वर्ग 3 कोच, 3 स्लीपर कोच आणि एक जनरल कोच असलेली होती. ही गाडी वर्धा ते सेवाग्राम एक्सप्रेस ट्रेन क्र. 12140 ने मुंबईसाठी निघायची. आणि परतताना मुंबई-बल्लारपूर लिंकचे डबे गाडी क्रमांक सेवाग्राम 12139 ने यायचे. रेल्वे बोर्डाने लिंक कोचेस बंद जरी केल्या असल्या तरी मुंबईसाठी डायरेक्ट ट्रेन सुरु होईस्तवर हि सोया पूर्ववत देण्याची गरज आहे.
आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी रेल्वे मंत्री वैष्णव यांना विनंती केली आहे की, ही ट्रेन पूर्ववत सुरू करावी या मागणीवर रेल्वे मंत्रालयाकडून लवकरच निर्णय अपेक्षित आहे. हि मागणी पूर्ण झाल्यास हजारो प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे.
Tags
चंद्रपूर