◼️ब्लड बँक अधिकार्यांना रक्तासाठी काम करणाऱ्या अनेक फाऊंडेशन चे निवेदन..*
चंद्रपूर - चंद्रपूर जिल्हा डेंग्यू सारख्या अनेक आजाराने ग्रस्त आहेत, डेंग्यू , वायरल, डीलेवरी पेशंट, अपघात अश्या , रुग्णांना तात्काळ रक्ताची आवश्यकता असते. शासकिय रूग्णालयातील रुग्णांना ह्याच रक्तपेढीवर अवलंबून राहवे लागते. पण पीडित गरजु रूग्णांना रक्तासाठी ताटकळत बसावे लागते, रक्त दात्यांना दोन दोन तास डॉक्टर अभावी रक्तदान करण्यास उभे राहावे लागत होते. यामुळे अनेक रुग्णांना आपले जीव गमविण्याची पाळी येण्याची शक्यता आहे, रक्त पुरवठा व्यवस्थित व्हावा, रक्ताच्या टेस्ट कीट उपलब्ध व्हावा, कर्मचारी स्टॉप कमी असलेले जागा तात्काळ भरून घ्याव्या. अश्या अनेक अडचणी घेउन अनेक रक्त संदर्भात काम करणाऱ्या संस्थेनी ब्लड बँक अधिकारी डॉ जीवने साहेब, डॉ प्रेमचंद साहेब यांना निवेदन देण्यात आले. आणि ज्या काही समस्या आहेत त्यावर तत्काळ तोडगा काढण्यात यावा या संबंधी मागणी करण्यात आली . डॉक्टरांनी सुद्धा या समस्या गंभीर असून, या समस्या लवकरात लवकर सुटतील या बाबतीत दखल घेऊ अशी हमी दिली.
1) रक्तदान महादान निःस्वार्थ फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष हकीम हुसेन, मोणु रामटेके*.
2) दी हेल्पिंग हँड्स विजय फाऊंडेशनचे संस्थापक/अध्यक्ष- अजय सुनीता लहानुजी दुर्गे, उपाध्यक्ष - जय राजभर, हर्शवर्धन कोठारकर*
नाते रक्ताचे फाऊंडेशनचे अध्यक्ष किसन नागरकर*
लाइफलाईन फाऊंडेशनचे अध्यक्ष रिंकू कुमरे*
सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष राज खंडारे*
शहीद भगतसिंग फाऊंडेशनचे अध्यक्ष विनोद सुडित*
वरील सर्व सामाजिक संस्था आणि संघटनेद्वारे वारंवार समस्यांवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जातात आणि अनेकांना निस्वार्थ मदत करून सामाजिक बांधिलकी जोपासली जाते...
Tags
Chandrapur