◼️मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे,मुख्यमंत्री महाराष्ट्र यांना युवक कांग्रेस तर्फे निवेदन...*
◼️नोकऱ्यांचे कंत्राटीकरण करुण स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुण तरुणींचा,बेरोजगार तरुण तरुणींची आणि खेळाडूंची थट्टा करणारा शासन निर्णय रद्द करा :- कुणाल चहारे..*
चंद्रपूर :- राज्यातील ५ लाख १४ हजार जागा भरण्याचे कंत्राट खासगी संस्थांना दिले गेले असल्याने जवळपास अडीच हजार कोटी रुपयाची लूटमार या संस्था करणार आहेत.
राज्य सरकारने ६ सप्टेंबरला एक शासन निर्णय काढून सर्व शासकीय नोकऱ्या या कंत्राटीपद्धतीने भरल्या जाणार असून यासाठी खासगी ९ संस्थांना नोकरभरतीबाबतचे कंत्राट देण्यात आले आहे असे जाहीर केले. महाराष्ट्रातील तरुणांच्या तोंडाल पाने पुसण्याचे काम महाराष्ट्र शासन करत आहे. एकी कडे आम्ही सत्तेत आलो तर आम्ही सगळ्या शासकीय नोकऱ्या भरू असे म्हणणारे हे निर्दयी सरकार कंत्राटीकरण करुन तरूणांची दिशाभूल करत आहे. महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो युवकांच्या स्वप्नांची हत्या करण्याचे काम ह्या निर्णयाने झाले आहे.
हा एक तुघलकी फर्मान पण आहे आरक्षण संपवण्याचा. हा शासन निर्णय काढून आपला राजकीय हेतू साधण्याचा काम सरकार करत आहे.
राज्यातील तरुणांना देशोधडीला लावणारा हा शासन निर्णय असल्याने हा शासन निर्णय रद्द केला नाही तर सरकारच्या या जुलमी निर्णयाविरुद्ध तीव्र आंदोलने करण्यात येईल.
निवेदन देतान कुणाल चहारे ,प्रदेश सचिव युवक काँग्रेस, राजीव साखरकर माजी मुख्याध्यापक, भानेश जंगम जिल्हा उपाध्यक्ष,अजय बाणकर, रोशन शास्त्रकार, विशाल चहारे, अक्षय रामेलवर. इत्यादी उपस्थित होते.