◼️चंद्रपूर जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार स्व.बाळुभाऊ धानोरकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ सामान्य ज्ञान स्पर्धा..*
◼️ऊर्जानगर दुर्गापूर क्षेत्रातील शालेय विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावा या हेतूने विद्यार्थ्यांकरिता स्पर्धेचे आयोजन..*
◼️इंटक युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रशांत भाऊ भारती यांनी केले स्पर्धेचे आयोजन..*
चंद्रपूर :- जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार स्वर्गीय बाळूभाऊ धानोरकर यांच्या स्मृती प्रीत्यर्थ ऊर्जानगर दुर्गापूर क्षेत्रातील शालेय विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावा या हेतूने विद्यार्थ्यांकरिता दिनांक 26 ऑगस्ट 2023 रोजी सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन नॅशनल प्राथमिक शाळा वार्ड क्रमांक १ ऊर्जानगर, नॅशनल गर्ल्स हायस्कूल वार्ड क्रमांक ५ ऊर्जानगर, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वार्ड क्रमांक ५ कोंडी, जनता महाविद्यालय दुर्गापुर, विद्या मंदिर हायस्कूल ऊर्जानगर, येथे करण्यात आले. सदर स्पर्धेत 1000 हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेचे आयोजन इंटर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रशांत भाऊ भारती यांनी केले होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी करिता ग्रामपंचायत सदस्य श्री सागर तुरक, माझी कार्यकर्ते श्री किसन आरदळे, आलोक चवरे रवि दुर्गे व सर्व कॉंग्रेस कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले...
Tags
Chandrapur