◼️मा. आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली वरोरा तसेच भद्रावती तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने काॅंग्रेसच्या जनसंवाद पदयात्रेची नियोजन बैठक संपन्न*
चंद्रपूर :- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्यभरात 3 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर या कालावधीत जनसंवाद पदयात्रा काढण्याचे ठरविले आहे. त्या अनुषंगाने सदर जनसंवाद यात्रा वरोरा व भद्रावती तालुक्यात काढण्याच्या संदर्भाने नियोजनाची बैठक आमदार जनसपंर्क कार्यालय,वरोरा व शासकीय विश्राम गृह,भद्रावती येथे पार पडली.
काॅंग्रेसचे नेते, खासदार राहुलजी गांधी यांनी देशभरात काढलेल्या भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर ही पदयात्रा राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये काढण्यात येणार आहे. सदर पदयात्रेच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणांबद्दल जनजागृती करणे, राष्ट्रीय व राज्य पातळीवरील जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, शेतकऱ्यांचे प्रश्न या समस्यांबाबत जनतेशी संवाद साधत जनभावना जाणुन घेणे हा यात्रेचा उद्देश आहे.
सदर यात्रेची सुरुवात महापुरुषांच्या पुतळ्याला अभिवादन करून होणार आहे. सदर यात्रा वरोरा व भद्रावती तालुक्यातील विविध गावांतून जाणार आहे. यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन यावेळी मा. आमदार प्रतिभाताई धानोरकर तसेच प्रमुख उपस्थित मान्यवरांनी केले.
सदर बैठक काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आजी काॅंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
Chandrapur