◼️जनसंवाद पदयात्रेतून असंतोषाचा आवाज पुढे येईल - इंटक कांग्रेस जिल्हाध्यक्ष प्रशांत भारती*
चंद्रपूर - देशात असंतोषाची लाट निर्माण झाली आहे. केंद्र व राज्य सरकार सामान्य जनतेचे प्रश्न विसरून फक्त स्वार्थाचे राजकारण करीत आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो अभियानाला देशातून पाठिंबा आला आहे. त्याच धर्तीवर राज्यात देखील जनसंवाद पदयात्रा निघणार आहे. चंद्रपुरात देखील या पदयात्रेला मोठे यश मिळणार आहे.
ऊर्जानगर जिल्हा परिषद क्षेत्र तसेच दुर्गापूर जिल्हा परिषद क्षेत्र येथे जनसंवाद पदयात्रेत मोठ्या संख्येत नागरिकांनी सहभागी होण्याकरीता इंटक कांग्रेस जिल्हाध्यक्ष प्रशांत भारती जेष्ठ नेते इंटक यूनियन के.के सिंग जेष्ठ नेते शंकर खत्री यांच्या नेतृत्वात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जेष्ठ कॉंग्रेस नेते बाळू भाऊ चांदेकर आंबेकर काका सलीम भाई मुसा भाई ठाकरे साहेब इरपाते साहेब ऊर्जानगर सरपंच येरगुळे ताई पद्मापूरचे युवा नेते समीर भाई कपील सुखदेवे तसेच या क्षेत्रातील असंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती होती तसेच या क्षेत्रातील शेकडो नागरिकांची उपस्थिती सुद्धा होती. यावेळी इंटक नेते के. के सिंग यांची विशेष उपस्थिती होती.
भविष्यात केंद्र व राज्य सरकार विरोधातील असंतोष बाहेर येऊन सत्ता बदल नक्की होईल असा विश्वास इंटक कांग्रेस जिल्हाध्यक्ष प्रशांत भारती यांनी व्यक्त केला.
Tags
Chandrapur