◼️ताजने कुटुंबियांना इंटक जिल्हाध्यक्ष प्रशांत भारती यांच्या मदतीचा हात*
चंद्रपूर : समाजातील शेवटच्या घटकाला प्रत्यक्ष मदत करण्याच्या मानस दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या राहिला होता. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत इंटक जिल्हाध्यक्ष प्रशांत भारती हे सामाजिक वारसा पुढे नेत आहेत. आबोरा येथील ताजने यांचे घर शॉट सर्किटमुळे जाळले. त्यांच्या अंगावरील कपडे सोडता घरी इतर साहित्य काहीच हाती लागले नाही. हि माहिती मिळताच भारती यांची त्यांना किराणा सामानासह इतरही साहित्य त्यांना दिले. हे बघताच ताजने कुटुंबियांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.
समाजात वावरतांना समाजासाठी काही देणं असते. हि भावना असायला हवी. कोरोना काळात देखील आपल्यातील माणूस जागा असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. अशाच प्रकारे अबोरा वासियांना देखील माणुसकीला धावून जाणाऱ्या प्रशांतचा अनुभव आला. आंबोला येथील ताजने यांच्या घराला शॉट सर्किटने आग लागली. हि वार्ता पंचकोशीत पसरली. परंतु करायचे काय असा प्रश्न ताजने कुटुंबीयांसमोर पडला. हि बातमी इंटक जिल्हाध्यक्ष प्रशांत भरती यांच्या कानावर पडली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता. त्याच्या घरी किराणा साहित्य तसेच कपडे व इतर साहित्य तात्काळ पोहचविले.
यावेळी उर्जानगर ग्रामपंचायतच्या सरपंच मंजुषाताई येरगुळे, ग्रामपंचायत सदस्य सागर तुरक, माजी ग्रामपंचायत सदस्य किसन भाऊ अरदळे व काँग्रेस कार्यकर्ते, आबोरा, उर्जानगर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रशांत भारती यांच्या कार्याची पंचकोशीत चर्चा होत आहे.
Tags
Chandrapur