◼️शिरपूर पोलिसांनी गौतस्करीचा केला पर्दाफाश....!
◼️1 लाख 97 हजार किमतीची 9 जनावरे वाचवली...
वणी :- पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या कुंड्रा गावातून बेलामार्गे आदिलाबाद तेलंगाना राज्यात जाणाऱ्या गोवंश तस्करीचा पर्दाफाश शिरपूर पोलिसांचा माध्यमातून करण्यात आला असून घटनास्थळावरून 1 लाख रुपये 97 हजार रू किमतीचे 9 नग गोवंशाची सुटका करून 4 ही आरोपीना अटक करण्यात आली असून शिरपूर पोलिसांना मोठे यश देखील आले.
सविस्तर वृत्त असे की, 8 ऑगस्ट रोजी धुनकी डोर्लीकडुन कुंड्रा गावाकडे ईसम नामे 1) रमेश शालीकराव पेंदोर वय (38 वर्ष) रा. कुड्रा, देविदास नानाजी भोस्कर (वय 42 वर्ष) रा. कुड्रा, 3) भोलाराम सुरेश पडोळे (वय 28 वर्ष) रा. डोर्ली ता. वणी जि. यवतमाळ यांनी एकुन 09 गोवंशीय जनावरे एकुन किमंत 1,97,000/- रुपये किमतीची एकमेकांना अखंड दोरीने बांधुन जनावरांची शेपुट मरगळुन निदर्यपने दामटत/पळवत जनावरांना मारहाण करीत कत्तलीकरीता घेऊन जात होते तसेच डोर्ली येथुन कुंड्रा गावाकडे असलेला सचिन महादेव थेरे हा ही तिथे मिळून आला. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी ही जनावरे तेलंगाना राज्यात कत्तलीसाठी विक्री करिता नेणार असल्याची स्पष्ट कबुली दिली. तस्कराच्या तावडीतून सुटका करण्यात आलेल्या सर्व 9 जनावरांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून श्रीराम गोरक्षण ट्रस्ट, रासा गोशाळा येथे रवाना करण्यात आले असून पशुवैधकीय अधिकारी डॉ. महेश डहाके यांचाकडुन तपासणीचे पत्र देवून त्यांची शारीरिक चाचणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 सहकलम 119, जनावराना चारा पाण्याची व्यवस्था न करता कत्तलीसाठी विक्रीकरिता पायदळ निर्दयीपणे व क्रूरपने जनावरे घेऊन जाणे कलम 11(1)(क )(च )(ज) महाराष्ट्र पोलीस अधीनियम 1951 चे कलम 119 प्रमाणे कायदेशीर करण्यात आली.
सदर कारवाई वरिष्ठांचा आदेशानुसार वणी उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाने शिरपूर पोलिस स्टेशन ठाणेदार गजानन करेवाड यांच्या नेतृत्वात नापोका गंगाधर घोडाम, अभिजित कोष्टावार, राजन इसणकर यांनी केली. पुढील तपास शिरपूर पोलिस करीत आहे.
Tags
Yavatmal