*चंद्रपूर - मूल मार्ग चारपदरी करा* *आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी*

🔴 चंद्रपूर - मूल मार्ग चारपदरी करा !

◼️आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी...


चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा आहे. येथे मोठ्या प्रमाणात वाहने ये - जा करीत असतात. अरुंद रस्त्याने मोठ्या वाहनाचे अवगमन होत असल्याने अपघाताच्या घटनेत वाढ होत आहे. असाच मार्ग म्हणजे चंद्रपूर - मूल मार्ग या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले असल्याने हा मार्ग चारपदरी करा अशी लोकहितकारी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. 



चंद्रपूर - मूल मार्गाने मोठ्या प्रमाणात गडचिरोली व इतर ठिकाणी वाहने ये - जा करीत असतात. या मार्गावर जाणारी वाहने हि मोठी असून रास्ता मात्र अरुंद आहे. त्यामुळे अनेकदा मोठ्या वाहनांमध्येच अपघात झाल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात. आजवर अनेक  लोकांनी या मार्गवर अपघातात आपला जीव गमावला आहे. तर शेकडो लोकांना अपंगत्व देखील आले आहे. त्यामुळे हा मार्ग चारपदरी करून सातत्याने होणाऱ्या अपघाताला ब्रेक लावण्यासाठी चंद्रपूर - मूल मार्ग चारपदरी करण्याची लोकहितकारी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
Previous Post Next Post