*स्व.गोपाळराव वानखेडे विद्यालयातर्फे गुणवंत विद्यार्थी तसेच सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा सत्कार* *डाँ ए पी जे अब्दुल कलाम यांचे विचार विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे-आमदार अभिजित वंजारी*

◼️स्व.गोपाळराव वानखेडे विद्यालयातर्फे गुणवंत विद्यार्थी तसेच सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा सत्कार...

◼️डाँ ए पी जे अब्दुल कलाम यांचे विचार विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे-आमदार अभिजित वंजारी.


चंद्रपूर :-
स्व गोपाळराव वानखेडे विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय नांदगाव पोडे येथे इयत्ता 10 वि व 12 वि मधील गुणवंत विद्यार्थी आणि सेवानिवृत्त मुख्याध्यापकांच्या सत्कार समारंभ संपन्न झाला,कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. अभिजीतदादा वंजारी मुख्य प्रतोद तथा आमदार विधान परिषद,विशेष अतिथी मा. सुधाकरराव अडबाले आमदार विधान परिषद,मा. रामुभैय्या तिवारी शहर जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी,मा. चंदाताई वैरागडे महिला अध्यक्ष काँग्रेस कमिटी,मा डाँ रुपेश ठाकरे प्लास्टिक सर्जन, शाळेचे राज्य पुरस्कार प्राप्त प्राचार्य नरेंद्र बोबडे यांची उपस्थितीत संपन्न झाला,प्रथमतः पदवीधर  आणि शिक्षक असे दोन्ही आमदार प्रथमतः शाळेत दिल्याबद्दल शाळेच्या वतीने आमदार अभिजितदादा वंजारी आणि आमदार सुधाकरराव अडबाले यांचा शाल श्रीफळ सन्मान चिन्ह आणि रोपटे देऊन यथोचित सत्कार करण्यात आला . 


प्रास्ताविक भाषणातून प्राचार्य नरेंद्र बोबडे यांनी शाळेत सुरू असलेल्या उपक्रमाचा आणि आज पर्यंत शाळेला  सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचा आवर्जून उल्लेख करून अहवाल सादर करताना इयत्ता 10 वि च्या 121 विद्यार्थ्यांमधून 117 विद्यार्थी आणि 12 वि कला शाखेतून 63 पैकी 62 आणि विज्ञान शाखेचे 39 पैकी 39 विद्यार्थी  उत्तीर्ण झाले यामध्ये जे विद्यार्थी गुणवत्तेत आले त्यांच्यासाठी आज इथे सत्काराचे आयोजन केले आहेत सोबत चंद्रपूर जिल्हा मुख्याध्यापक अशोसिएशन या नोंदणीकृत संघटनेचे  6 पदाधिकारी नुकतेच सेवानिवृत्त झाले त्याचाही सत्कार याठिकाणी होत आहे ,तसेच  आमच्या शाळेत विज्ञान शाखा सुरू झाल्यामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना दूरवर जाऊन शिक्षण घेण्याची अडचण दूर झाली यासाठी विज्ञान शाखेची शासनाची मान्यता आमदार अभिजित वंजारी यांनी अगदी कमी कालावधीत मिळवून दिल्याबद्दल आमदार महोदयांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले,शहर जिल्हाध्यक्ष रामुभैय्या तिवारी यांनी ही शाळा एक उपक्रमशील आणि नावारूपाला आलेली ग्रामीण भागातील अतिशय सुंदर शाळा आहे,या शाळेला दोन्ही आमदार महोदयांनी सहकार्य करावे असे आव्हाहन केले,महिला अध्यक्ष सौ चंदाताई वैरागडे यांनी ग्रामीण भागातील इतकी सुंदर आणि उपक्रमशील शाळा बघून सर्व शिक्षकांचे मुक्तकंठाने अभिनंदन केले ,डाँ रुपेश ठाकरे यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत आरोग्याची काळजी घेन्याचे  आव्हान केले.


आमदार सुधाकरराव अडबाले सर यांनी विधीमंडळात शिक्षकांचे प्रश्न कश्याप्रकारे सोडविले याबद्दल सविस्तर माहिती दिली आणि भविष्यात हे शासन  शिक्षकांच्या नोकऱ्यावर कश्या प्रकारे गदा आणू शकेल याचा नेम नाही त्यामुळे शिक्षकांनी तत्पर असायला पाहिजे, मला निवडणुकीत प्राचार्य  बोबडे सर आणि त्यांच्या संपूर्ण टीम ने भरघोस मतांनी निवडून येण्यासाठी फार मोठे सहकार्य केले आहे आणि मी सुद्धा नांदगाव शाळेला आधीपासूनच सहकार्य करीत आहे आणि यापुढेही सर्वोतोपरी सहकार्य करेल असे मनोगतातून व्यक्त केले,कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार अभिजित वंजारी यांनी  वानखेडे विद्यालय ही ग्रामीण भागातील बोबडे सरांची शाळा एक नावलौलीक प्राप्त करणारी शाळा आहे,या शाळेत विज्ञान शाखा नाही ही बाब मला माहित होताच मी लगेच या शाळेला विज्ञान शाखेची परवानगी शासनाकडून मिळवून दिली आता याच शाळेत विद्यार्थ्यांना  उच्च शिक्षण घेण्यासाठी वरिष्ठ महाविद्यालय सुरू करा मी निश्चितच परवानगी मिळवून देईल असे सांगून शाळेची शिस्त,निसर्गरम्य परिसर आणि विद्यार्थ्यांची प्रगती बघून शाळेतील सर्व शिक्षक वृंदाची प्रशंसा केली आणि शाळेला आवश्यक असणाऱ्या  सोयी सुविधा करण्यासाठी स्थानिक विकास निधी उपलब्ध करून देईल असे मनोगतातून सांगितले,सत्कार सोहळ्यात शाळेतील गुणवंत विद्यार्थी अमन पाचभाई,आर्यन ठाकरे,सेजल हंसा,पल्लवी ढोबे,अक्षया भूतखुरी,रंजना रविदास,आदित्य हंसकार तसेच नर्सिंग क्षेत्रात राष्ट्रपती पुरस्कार मिळालेल्या सौ पुष्पा पोडे-पाचभाई ,चंद्रपूर जिल्हा मुख्याध्यापक असोशिएशन चे पदाधिकारी आणि नुकतेच सेवानिवृत्त झालेले मुख्याध्यापक  सौ स्मिता ठाकरे घुघुस ,राजू साखरकर चंद्रपूर,पुरुषोत्तम ननावरे शिंदेवाही,कारूजी अलोने गोंडपीपरी,प्रताप नगराळे ब्रम्हपुरी ,भास्कर पारखी वरोरा यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.


कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन सौ सारिका कुचनकर यांनी तर आभार काकडे सर यांनी मानले,कार्यक्रमाला चंद्रपूर जिल्हा मुख्याध्यापक अशोसिएशन चे सर्व पदाधिकारी शिंदे सर,परोधे सर पिदूरकर सर  ,दंतूलवार सर पंधरे मॅडम, नीमसरकर सर ,लांबट सर,पावडे सर वागदरकर सर सावरकर सर ,चुकलवार सर ,इत्यादी मुख्याध्यापकासह विमाशीचे अध्यक्ष केशव ठाकरे सर,सचिव श्रीहरी शेंडे तसेच गुणवंत  विद्यार्थ्यांचे  पालक ,शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आणि  विद्यार्थी उपस्थित होते..
Previous Post Next Post