*"इंडिक टेल्स" या वेबसाईट वर कायदेशीर कारवाई करणेबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन...*

◼️"इंडिक टेल्स" या वेबसाईट वर कायदेशीर कारवाई करणेबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन...


चंद्रपूर :- 
शरयु फाऊंडेशन ट्रस्ट या संस्थेव्दारा चालविल्या जाणाऱ्या "इंडिक टेल्स" या बेबसाईट वर महाराष्ट्रातील पहिली महिला शिक्षिका क्रांती ज्योती सावित्रीआई फुले याच्या बद्दल अतिशय घृणास्पद व निदंणीय माहीत प्रसारीत केल्याबद्दल "इंडिक टेल्स" वेबसाईट वर कठोर कार्यवाही करण्यात यावी. याकरिता क्षत्रिय माळी समाज सेवा मंडळ चंद्रपूर च्या वतीने या मा. अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केलेले आहे.

या वेबसाईटवर इतिहासाच्या पूर्नमांडणीच्या नावाखाली जुना इतिहास बदलविण्याचे षडयंत्र आहे. अशी समाज विघातक प्रवृत्तीवर सरकारने प्रतिबंध घालण्याची गरज आहे. क्रांती ज्योती सावित्रीआई यांनी गोरगरीबासाठी, दलीत, पिडीत आणि इतरही अनिष्ठ प्रथा मोडीत काढत आपल्या जीवाचे रान केलेले आहे. त्याबद्दल क्रांती ज्योती सावित्रीआई यांचा नाहीतर देशातील महिलाचा अपमान केलेला आहे.


अलिकडेच्या काळात बहुजन समाजातील होवून गेलेल्या महापुरुषाविषयी तथा महिला विषयी बदनामकारक वक्तव्ये व लिखान प्रसारीत करून जनसामन्यात बुद्धीभय निर्माण करण्याचा हेतू परस्पर जातीवादी व धर्मवादी संघटना कडून केले जात आहे.

त्याकरिता "ईडीक टेल्स" या वेबसाईट वर कार्यवाही करण्यात यावी. या कार्यवाहीचे निवेदन सादर करताना सर्वश्री गजाननराव गांवडे गुरुजी, नंदूजी नागरकरजी, बबनराव वानखेडे, राजूजी बनकर, रामदासजी दानव, घनश्यामजी वासेकर, सचिन निबांळकर, श्याम राजुरकर, विजयराव म.राऊत. शैलेश इंगोले, राकेश चहारे, मनोज वासेकर, कार्तीके वानखेडे, राकेश वानखेडे, वकारशी आदि माळी व इतर समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते.
Previous Post Next Post