*कार्यकर्त्यांना बळ देणारा नेता गमावला खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्यासारखा नेता पुन्हा होणे नाही..* *A leader who gave strength to workers has been lost* *A leader like MP Balubhau Dhanorkar will never happen again*

◼️ कार्यकर्त्यांना बळ देणारा नेता गमावला...

◼️खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्यासारखा नेता पुन्हा होणे नाही:- रितेश (रामू) तिवारी
जिल्हाध्यक्ष चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमेटी चंद्रपूर...


चंद्रपूर : कार्यकर्त्यांवर जिव लावणारा, संकटकाळात कार्यकर्त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणारा, कार्यकर्ते हेच आपले कुटुंब मानणारा नेता म्हणजे खासदार बाळूभाऊ धानोरकर. घरी कोणताही राजकीय वारसा नव्हता. मात्र, समाजासाठी काही, तरी करण्याची जिद्द मनात होती. यातूनच बाळूभाऊ नावाचा तारा जिल्ह्याच्या राजकारणात उदयास आला. आपली राजकीय कारकिर्द कार्यकर्ता म्हणून सुरू करणाऱ्या बाळूभाऊंनी पुढील संपूर्ण राजकीय आयुष्य कार्यकर्त्यांना बळ देण्यात आणि गोरगरिब जनतेची प्रश्न सोडविण्यात घालवली.
त्यामुळे भद्रावती या छोट्याशा गावापासून सुरू झालेला त्यांचा राजकीय प्रवास दिल्लीच्या संसदेपर्यंत पोहचला. मात्र, कार्यकर्त्यांना बळ देणारा, त्यांना समजून घेणारा नेता आज आपल्यात नाही, यावर विश्वासच बसत नाही. बाळूभाऊंनी राजकीय जिवनात ऐन बहरण्याच्या वेळी अचानक एक्झिट केली. त्यांची ही एक्झिट सर्वांच्या मनाला चटका लावणारी आहे. खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्यासारखा दुसरा नेता पुन्हा होणे नाही.
पेशाने शिक्षक असलेल्या नारायणराव धानोरकर यांच्या घरी ४ जुलै १९७५ रोजी बाळूभाऊंचा जन्म झाला. लहानपणापासूनच हुशार असलेल्या बाळूभाऊंनी चांगले शिक्षण घेऊन जिवनात यशस्वी व्हावे, अशी त्यांच्या कुटुंबीयांची इच्छा होती. परंतु, समाजातील गोरगरिबांचे दुख बाळूभाऊंना स्वस्थ बसू देत नव्हते. आपण समाजाला काही देण लागतो, या भावनेतून बाळूभाऊंनी समाजकार्य सुरू केले. यानंतर मतदारांनी त्यांच्यावर भरभरून प्रेम केले. भद्रावती-वरोरा विधानसभा क्षेत्राचे आमदार म्हणून संधी दिली. लगेच पुढील लोकसभेच्या निवडणुकीत खासदार म्हणून संसदेत पाठविले.


बाळूभाऊ यांनी कधीही खासदारीकाचा आव आणला नाही. त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्ते थेट त्यांच्यापर्यंत पोहचू लागले. संपूर्ण लोकसभा क्षेत्रात त्यांनी कार्यकर्त्यांची फळी तयार केली. भाऊंसोबत मित्र म्हणून आणि नंतर चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष म्हणून घालविलेले प्रत्येक क्षण आनंदी आहेत. भाऊंसोबतच्या अनेक आठवणी आहेत. मात्र, आता या केवळ आठवणीच राहिल्या आहेत. भाऊंच्या जाण्याने मी जिवनातील चांगला मित्र गमावला आहे. काँग्रेस पक्षासोबतच चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. धानोरकर कुटुंबीयांचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. धानोरकर कुटुंबीयांच्या दुखात आम्ही सर्वजण सोबत आहो. हे दुख पचविण्याची देवाने त्यांना शक्ती द्यावी, ही प्रार्थना...
भाऊ...
भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐



Previous Post Next Post