*खासदार बाळू धानोरकर सर्व समाजाला घेऊन चालणारे नेते : माजी मंत्री बाबा सिद्दिकी* *Khasdar Balu Dhanorkar A leader who takes all the society: Former Minister Baba Siddiqui*

◼️खासदार बाळू धानोरकर सर्व समाजाला घेऊन चालणारे नेते : माजी मंत्री बाबा सिद्दिकी...




चंद्रपूर : राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रात सर्व समाज, पंथ, जात धर्म घेऊन चालावे लागते. तेव्हा संघटन अधिक मजबुत होत असते. चंद्रपूर चे खासदार बाळू धानोरकर हे सर्व समाजाला एकत्रित करणारे नेते आहेत, असे प्रतिपादन माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांनी केले.


येथील शकुंतला फॉर्म्स नागपूर येथे चंद्रपूर जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक कमिटीच्या वतीने ईद मिलन समारोह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.


यावेळी माजी मंत्री बाबा सिद्धीकी, आमदार सुभाष धोटे, आमदार सुधाकर अडबाले, आमदार प्रतिभाताई धानोरकर, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण तथा शहर अध्यक्ष रामू तिवारी, भद्रावती न. प. नगराध्यक्ष अनिल धानोरकर, यवतमाळ मध्यवर्ती बँक अध्यक्ष टिकाराम कोंगरे, माजी पालकमंत्री हाजी अनिस अहमद, प्रदेश महासचिव जिया पटेल, माजी आमदार वामनराव कासावार, माजी आमदार देवराव भांडेकर, राष्ट्रीय अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष अध्यक्ष  प्रवीण खोब्रागडे, प्रदेश महासचिव विनोद दत्तात्रय, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस माजी जिल्हाध्यक्ष सुभाष गौर, राजुरा न. प. माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, काँग्रेस युवा नेते जितेंद्र मोघे, काँग्रेस महिला काँग्रेस जिल्हा अध्यक्ष नम्रता ठेमस्कर, काँग्रेस महिला शहर अध्यक्षा   चंदाताई वैरागडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी सचिव विजय नळे, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष सोहेल राजा शेख़, काँग्रेस नेते दिनेश चोखारे, काँग्रेस नेते महेश मेंढे, दीपक जयस्वाल, अंजुम गौस, नसीम शेख, नईम मेमन,  जावेद पठाण, माजी नगरसेविका सुनीता लोढीया, सकीना अन्सारी, बलबीलशिंग गुरंम, ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रशांत दानव, माजी नगरसेवक गोपाळ अमृतकर, रमज़ान घायल, अल्पसंख्याक शहर अध्यक्ष ताजु शेख़,  प्रशांत भारती, आमीर शेख़, बापू अंसारी, वासिम गाउस ,कुणाल चहारे,राजवीर यादव, रमीज़ शेख़, फ़राज़ अहेमद, आतिफ़ रजा, आरिफ़ शेख़, शेबाज खान ,रहेनुल शेख़, नसीम शेख़,ज़मीर शेख़,शोएब खान,रियाज़ शेख़ यांची उपस्थिती होती. 



खासदार बाळू धानोरकर यावेळी म्हणाले कि, देशात सध्या जातीयवाद मोठ्या प्रमाणत सुरु आहे. जातीजातीत दुरावा करण्याचे पाप मोदी सरकार करीत आहे. यामुळे अशा कार्यक्रमाची गरज आहे. ईद मुबारक या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या पूर्वजाना अभिप्रेत असलेला भारत दिसून आला आहे. या कार्यक्रमात धर्मा - धर्मातील दुरावा दूर सारून सर्व लोक एक आलेत. हे चित्र समाधानकारक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. 


माजी पालकमंत्री अनिस अहमद बोलतांना  म्हणले कि, खासदार बाळू धानोरकर यांचा रूपाने गटातटाचे राजकारण दूर करून कार्यकर्त्यांना एक ठेवणारा खासदार चंद्रपूर कराना मिळाला आहे. हे बघून समाधान वाटल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
Previous Post Next Post