*रहमत नगर और बिनबा गेट येथील बिलाल कॉलनी मधील रहिवाशांच्या समस्या तात्काळ मार्गी लावु खासदार प्रतिभा धानोरकर यांचे आश्वासन..* *हजरत टिपू सुलतान फाऊंडेशन चंद्रपूर तर्फे निवेदन देण्यात आले*

रहमत नगर और बिनबा गेट येथील बिलाल कॉलनी मधील रहिवाशांच्या समस्या तात्काळ मार्गी लावु खासदार प्रतिभा धानोरकर यांचे आश्वासन..

हजरत टिपू सुलतान फाऊंडेशन चंद्रपूर तर्फे निवेदन देण्यात आले


चंद्रपूर महानगरपालिका अंतर्गत असणाऱ्या रहमत नगर और  बिनबा गेट मधील बिलाल कॉलनी परिसरामध्ये ईराई नदीच्या पात्रातील पाणी अडल्यामुळे बिलाल कॉलनी मध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे तिथे राहणाऱ्या नागरिकांच्या घरामध्ये पुराचे पाणी जात असून नागरिकांना शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे त्याचप्रमाणे सदर परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याची नळ कनेक्शन नसल्यामुळे नागरिकांना मूलभूत सोयी उपलब्ध होत नसल्याचे निवेदन खासदार प्रतिभाताई धानोरकर यांना हजरत टिपू सुलतान फाउंडेशन चे अध्यक्ष इंजिनियर अमीर शेख,कार्यकारी अध्यक्ष सय्याद फराज यांच्यामार्फत देण्यात आले.


 याला लगेच प्रतिसाद देत खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी बिलाल कॉलनी मधील नागरिकांच्या होत असलेल्या गैरसोई बाबत खेद व्यक्त करत लवकरात लवकर सदर परिसरातील नागरिकांना त्यांच्या मूलभूत सोई सुविधा उपलब्ध करून देऊ त्याचप्रमाणे इराई नदीच्या पात्रालगत सुरक्षा भिंतीचे बांधकाम करून नदीच्या खोलीकरणाचे काम लवकर करण्यात येईल असे आश्वासन दिले सदर शिष्ट मंडळात वहाब भाई,शादाब शेख,किफायत खान अमजद खान,फरहान शेख,ज़मीर भाई,समीर भाई,फिरोज भाई, कल्लू भाई, इदरीस भाई,मुजू भाई,पपई भाई, साहिल शेख आरिफ शेख, मुस्तफा शेख, रेहान खान सय्याद बाबा भाई,हुसैन भाई,यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
Previous Post Next Post