*जातनिहाय जनगणेसाठी खासदार धानोरकरांनी घेतली राष्ट्रपतीची भेट..*

जातनिहाय जनगणेसाठी खासदार धानोरकरांनी घेतली राष्ट्रपतीची भेट..


चंद्रपूर :- महाराष्ट्रात मराठा समाज मनोज जंरागे याचे नेतृत्वात आरक्षणाच्या मागणीसाठी आदोंलन करित असतानां खा.प्रतिभा धानोरकर यांनी शुक्रवारी राष्ट्रपती भवनात मा. राष्ट्रपती र्द्रोपदी मुर्मु यांची भेट घेत जातीनिहाय जनगणेची मागणी केली.
विविध जातीचा आरक्षणासाठी लढा सुरु असुन अनेक आदोंलने महाराष्ट्रात सुरु आहेत. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मराठा समाजाचे आरक्षणासाठी आदोंलन सुरु आहे. या आदोंलनाचा तिढा अदयापही राज्य शासन सोडवु शकले नाही. अनेक आदोंलन कर्त्यानी आरक्षणासाठी प्राण देखिल गमावले. मागिल 14 वर्षापासून अदयापही केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना केली नाही. यामुळे सरकारकडे कुठलीही आकडेवारी उपलब्ध नाही. या पार्शभूमीवर खा. प्रतिभा धानोरकर यांनी मा. राष्ट्रपती र्द्रोपदी मुर्मु यांची भेट घेत, महाराष्ट्रातील तिढा सोडविण्याची मागणी या वेळी केली.


राज्यातील आरक्षणाचा तिढा सोडविण्यासाठी राज्य सरकार कढुन केंद्र सरकारने अहवाल मागवुन जातनिहाय जनगणना करुन 50 टक्के अरक्षणाची मर्यादा वाढवावी अषी मागणी देखिल यावेळी करण्यात आली. या संदर्भात राष्ट्रपती यांनी सकारात्मक चर्चा होवुन भविष्यात या मध्ये सरकारला मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्याच्या सुचना करणार असल्याचे सांगितले. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या सोबत खासदार वंसतराव चव्हाण, खासदार नागेश पाटील, खासदार संजय जाधव याची देखिल उपस्थिती होती.
Previous Post Next Post