*महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबीनेट मंत्री, आमदार मान, विजयभाऊ वडेट्टीवार, विजय- किरण फांऊडेशन' च्या वतीने, कर्करोगाचे (कॅन्सर) निदान करण्याकरिता फिरते कर्करोग [ कॅन्सर] रुग्णालय असलेल्या अॅम्बुलन्सचा लोकार्पण सोहळा*

◼️महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबीनेट मंत्री, आमदार मान, विजयभाऊ वडेट्टीवार, विजय- किरण फांऊडेशन' च्या वतीने, कर्करोगाचे (कॅन्सर) निदान करण्याकरिता फिरते कर्करोग [ कॅन्सर] रुग्णालय असलेल्या अॅम्बुलन्सचा लोकार्पण सोहळा!





चंद्रपूर :- महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबीनेट मंत्री, आमदार मान, विजयभाऊ वडेट्टीवार, विजय- किरण फांऊडेशन' च्या वतीने, कर्करोगाचे (कॅन्सर) निदान करण्याकरिता फिरते कर्करोग [ कॅन्सर] रुग्णालय असलेल्या अॅम्बुलन्सचा लोकार्पण सोहळा दि. 15 जुलै 2023 रोजी, वेळ सायं. 5:00 वा.
स्थळ : गांधी चौक, म.न.पा. पटांगण, चंद्रपूर येथे होणार आहे.


महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री व विद्यमान आमदार.मा.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांनी महाराष्ट्रातील पहिले "कॅन्सर केअर हॉस्पिटल ऑन व्हील्स"   महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेत समर्पित केले.

अत्याधुनिक तंत्रज्ञान बनावटीचे मोबाईल कॅन्सर स्क्रीनिंग हॉस्पिटल ऑन व्हील्स महाराष्ट्राच्या दुर्गम भागात पोहोचून  कर्करोगांची तपासणी करणार. ज्यामध्ये प्रामुख्याने स्तनाचा, तोंडाचा, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग प्रारंभिक टप्प्यात शोधून रुग्णांना जीवनदान देणार.

महाराष्ट्रातील ग्रामीण, आदिवासी आणि शहरी झोपडपट्टी वस्तीत राहणारे उपेक्षित आणि वंचित कुटुंब जे आर्थिक स्थितीमुळे कर्करोग तपासणी करू शकत नाही अश्या कुटुंबांसाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.


स्क्रिनिंग आऊटपुटच्या आधारावर रुग्णाला पुढील तपासणीची आवश्यकता असल्यास डॉक्टरांची टीम रुग्णाला पुढील उपचारासाठी घेऊन जाईल. उपेक्षित लोकसंख्येला  कर्करोगावर मोफत निदान आणि उपचारांचे फायदे देणे हे उपक्रमाचे अंतिम ध्येय आहे.

सर्व चंद्रपूरवासीयांनी याचा लाभ घ्यावा व उद्घाटन समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Previous Post Next Post