*पाणीपुरवठा योजना कंत्राटदाराच्या घशात घालून चंद्रपूरकरांचा घसा कोरडा करू नका..* *महानगर पालिका प्रशासनाविरोधात काँग्रेस चे गोपाल अमृतकर करणार एक दिवसाचे उपोषण..*

◼️पाणीपुरवठा योजना कंत्राटदाराच्या घशात घालून चंद्रपूरकरांचा घसा कोरडा करू नका..

◼️महानगर पालिका  प्रशासनाविरोधात काँग्रेस चे गोपाल अमृतकर करणार एक दिवसाचे उपोषण..


चंद्रपूर :- चंद्रपूर शहरात सध्या अमृत योजनेअंतर्गत नवीन नळ जोडणी चे काम सुरु आहे. हे काम अद्याप पूर्णत्वास होण्याच्या अगोदरच कंत्राटी पद्धतीने पाणीपुरवठा योजना चालविण्याबाबत पाणीपुरवठा योजना कंत्राटदाराच्या घशात घालून चंद्रपूरकरांचा घसा कोरडा करण्याचे पाप मनपा प्रशासन करीत आहे.


चंद्रपूर महानगर पालिकेतर्फे चंद्रपूर शहरातील पाणीपुरवठा योजना कंत्राटदारामार्फत चालविण्यात आलेली होती. याचे अनुभव चंद्रपूरकरांना फार वाईट आलेले असून कित्येकदा पाण्याबाबत पालिकेवर मोर्चे आंदोलने काढल्या गेले. पालिकेने सुद्धा कित्येकदा कंत्राटदाराला समज देऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत व शहरातील नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत वारंवार ताकीद दिल्या. या उपरातसुद्धा चार - चार दिवस नागरिकांना पाणी मिळत नव्हते. अखेरीस पालिकेतर्फे आमसभेत ठराव घेऊन कंत्राटदारांवर कारवाई करून कोर्टामध्ये खटला चालविण्यात आला होता. त्यानंतर पालिकेने पाणीपुरवठा चालविण्यासाठी स्वतःकडे घेतली होती. 






हा जुना अनुभव लक्षात घेता पाण्यासारखी अत्यावश्यक सेवा हि कंत्राटदाराच्या घशात न घालता मनपाने स्वतःकडे ठेवावी. मनपाने काढलेल्या पाण्याच्या खाजगीकरणाच्या विरोधात चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस तर्फे माजी नगरसेवक गोपाल अमृतकर दि २२ जून २०२३ ला  चंद्रपूर महानगर पालिकेच्या प्रवेश द्वारावर महात्मा गांधी यांच्या पुतळयाला पुष्पहार घालून सकाळी ९ वाजता उपोषण सुरु होणार असून रात्रों ९ वाजेपर्यंत उपोषन सुरु राहिल,तेव्हा कांग्रेस च्या सर्व कार्यकर्त्यांनी उपोषनात सहभाग नोंदवून सायंकाळी 6 वाजता होणाऱ्या सभेत उपस्थित राहावे ही विनंती चंद्रपूर शहर (जिल्हा )काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष रितेश उर्फ रामू तिवारी यांनी केले आहे..

Previous Post Next Post