*युवा कार्यकर्त्यांनी बळ देणारा नेता गमावला :- युवक काँग्रेसचे नौशाद शेख यांचे प्रतिपादन* *दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांना श्रद्धांजली* *चंद्रपूर शहर जिल्हा युवक काँग्रेस कार्यकर्त्यांचे आयोजन*

◼️युवा कार्यकर्त्यांनी बळ देणारा नेता गमावला :- युवक काँग्रेसचे नौशाद शेख यांचे प्रतिपादन..
◼️दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांना श्रद्धांजली..
◼️चंद्रपूर शहर जिल्हा युवक काँग्रेस कार्यकर्त्यांचे आयोजन..


चंद्रपूर : खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचे समाजातील शेवटच्या घटकांचा विकास हेच ध्येय होते. बाळूभाऊंनी सामान्य कार्यकर्ता म्हणून आपल्या राजकीय जिवनाची सुरवात केली. त्यामुळे त्यांना शहरापासून गावखेड्यातील कार्यकर्त्यांची चांगली जाण होती. संपूर्ण राजकीय आयुष्य त्यांनी कार्यकर्त्यांना बळ देण्यात आणि गोरगरिब जनतेचे प्रश्न सोडविण्यात घालविले. मात्र, अल्पावधीत झालेल्या त्यांच्या निधनाने जिल्ह्यातील संपूर्ण युवा कार्यकर्त्यांनी बळ देणारा नेता गमावला असल्याच्या शोकसंवेदना चंद्रपूर शहर जिल्हा युवक काँग्रेसचे नौशाद शेख यांनी व्यक्त केल्या. 






चंद्रपूर शहर जिल्हा युवक काँग्रेस कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून शनिवार दि. १७ जून रोजी सायंकाळी ६ वाजता शहरातील गांधी चौकात आयोजित श्रद्धांजली सभेत शेख बोलत होते. यावेळी पार्थ बाळू धानोरकर, मानस बाळू धानोरकर, प्रविण काकडे, चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी, काँग्रेसचे प्रदेश महासचिव विनोद दत्तात्रय, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. के. सिंग, चंद्रपूर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष चंदाताई वैरागडे, चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिनेश चोखारे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्यामकांत थेरे, गोपाल अमृतकर, माजी नगरसेवक प्रविण पडवेकर, पप्पू सिद्दीकी, ओबीसी विभागाचे प्रदेश पदाधिकारी प्राचार्य नरेंद्र बोबडे, सुनीताताई अग्रवाल, अनुसूचित जाती विभागाच्या अश्विनीताई खोब्रागडे, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष भालचंद्र दानव, राजू वासेकर, मतिन शेख, युसूफ चाचा, आयोजक नौशाद शेख, आयोजक राहुल चौधरी, दुर्गेश कोडाम, सलिमभाई, वहाबभाई, राजू खजांची, एनएसयुआयचे माजी जिल्हाध्यक्ष यश दत्तात्रय यांची उपस्थिती होती.










यावेळी उपस्थित मान्यवरांनी बाळूभाऊंच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले होते. राहुल चौधरी यांनी, कार्यकर्त्यांवर जिव लावणारा, संकटकाळात कार्यकर्त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणारा, कार्यकर्ते हेच आपले कुटुंब मानणारा नेता अशी खासदार बाळूभाऊ धानोरकर यांची ओळख होती. बाळूभाऊ यांच्या नेतृत्वात अनेक युवा कार्यकर्ते काँग्रेस पक्षात दाखल झाले होते. बाळूभाऊ हेच त्यांच्यासाठी सर्व काही होते. परंतु, बाळूभाऊंच्या आकस्मिक निधनाने सर्व कार्यकर्ते पोरके झाले असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला चंद्रपूर शहर जिल्हा युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Post Next Post